निष्क्रिय लोकांना पक्षात संधी म्हणत काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

अलीकडेच काही नियुक्त्या पक्षाने जाहीर केल्यानंतर गट पातळीवलील अनेक आजी-माजी नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानेच हे मत नोंदवले आहे
Party Workers upset on leader in Goa congress
Party Workers upset on leader in Goa congressDainik Gomantak

जे पक्षात क्रियाशील नाहीत आणि ज्यांचे कार्य आजपर्यंत अनेक मतदारसंघांत पोचू शकले नाही, अशांची वारंवार गोवा प्रदेश काँग्रेस (Goa Congress) समितीच्या पदांवर नियुक्ती का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत तसे करणे अयोग्य असल्याचे मत म्हापसा गट काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Party Workers upset on leader in Goa congress)

यासंदर्भात आपण पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे आज अशाच कारणांमुळे अनेक काँग्रेसजन असंतुष्ट व नाराज आहेत असे नमूद करून नार्वेकर म्हणाले, गोवा प्रदेश काँग्रेस समितीवर ही पदे निवडताना क्रियाशील व्यक्तींचा विचार होत नाही तोपर्यंत ते नि:स्वार्थी हेतूने पक्षाच्या विकासासाठी काम करणार नाहीत. जुनीजाणती मंडळी प्रत्यक्षात कार्य करीत नाहीत तोपर्यंत अशी पदे त्यांना देऊ नयेत.

Party Workers upset on leader in Goa congress
मांडवी नदीत 'गळ' टाकत काँग्रेसचे भाजप सरकारवर जोरदार ताशेरे

अलीकडेच काही नियुक्त्या पक्षाने जाहीर केल्यानंतर गट पातळीवलील अनेक आजी-माजी नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानेच हे मत मी नोंदवले आहे, असे स्पष्ट करून नार्वेकर म्हणाले, नियुक्त्या झालेले जवळजवळ सर्वच पदाधिकारी निवडणुकीतील उमेदवारीसाठी दावेदार आहेत असे समजते. असे असताना ते संपूर्ण राज्यातील निवडणूक प्रचार कसे पाहतील? जेव्हा त्यांचे संपूर्ण लक्ष एकाच मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी केंद्रित असेल तेव्हा संपूर्ण गोव्यात ते प्रचाराचे काम कसे करतील? असा सवालही त्यांनी केला. गोवा प्रदेश काँग्रेस समितीवर नियुक्त झालेल्या कुठल्याही माणसाशी आपले कुठलेही वैयक्तिक वैर नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com