Girl Death: पर्वरीत 19 वर्षीय युवतीची गळफास लावून आत्महत्या

घटनेचा पंचनामा करून युवतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविला.
Crime In Goa
Crime In GoaDainik Gomantak

पर्वरी येथे सुकूर पंचायतीजवळ असलेल्या वीस कलमी कार्यक्रमात वसाहतीत एका १९ वर्षीय मुलीने सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची नोंद पर्वरी पोलिस स्थानकात केली असल्याची माहिती उपनिरीक्षक प्रतीक भट प्रभू यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भट यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून युवतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविला.

Crime In Goa
Alcohol Raid: गोवा प्रशासनाची धडक कारवाई; छापेमारीत तीन कोटी रुपयांची विदेशी दारु जप्त

प्राथमिक अहवालानुसार ती युवती जास्त कोणाशी बोलत नसून वडिलांच्या मृत्यूनंतर एकटी राहत होती. या कुटुंबात तीन मुली असून एकीचा विवाह झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com