दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीत राजकीय नेत्यांचे वजन वाढले!

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची निवडणूक सासष्टीसह दक्षिण गोव्यातील काही नेत्यांचे राजकीय वजन वाढवणारी तर काही जणांना धोक्याची घंटी वाजवणारी ठरली आहे. 

मडगाव: दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची निवडणूक सासष्टीसह दक्षिण गोव्यातील काही नेत्यांचे राजकीय वजन वाढवणारी तर काही जणांना धोक्याची घंटी वाजवणारी ठरली आहे. 

सासष्टीतील मातब्बर नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांना बाणावलीत आपचा तरुण उमेदवार हेंजल फर्नांडिस यांनी दणका दिला आहे. कॉंग्रेसमधून भाजपात गेलेले बाबू कवळेकर, इजिदोर फर्नांडिस व क्लाफास डायस यांनी आपली राजकीय पत राखण्यास व भाजपात आपले वजन वाढवण्यास यश मिळवले आहे. तर नुवेचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार ब्रिझी बारेटो यांचा नुपवेत पराभव करून त्यांनाही मतदारांनी इशारा दिला आहे. 

जिल्हा पंचायतीच्या नुवे मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवार आसुसियाना रॉड्रिग्ज यांच्या विजयाने माजी पर्यटनमंत्री व माजी विजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांचे राजकीय वजन वाढले आहे. या दोघांनीही रॉड्रिग्ज यांना पाठिंबा दिला आहे. सिक्वेरा यांचा नुवेत पुनरागमन करण्याचा मनसुबा आहे, तर पाशेको यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. 

आणखी वाचा:

कोलवाळ, शिरसई ‘कांदोळकरां’च्‍या ताब्‍यात -

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे समर्थन लाभलेले चारही उमेदवार निवडून आल्याने भाजपात त्यांचे राजकीय वजन वाढणार आहे.कवळेकर यांचा प्रभाव असलेले  खोला, बार्शे, शेल्डे व गिरदोली या चारही मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. यापूर्वी खोला, बार्शे व गिरदोली मतदारसंघात कॉंग्रेसचे वर्चस्व होते. कवळेकर भाजपात आल्याने तसेच भाजपच्या इतर नेत्यांनी व कार्यकर्त्यांनीही नेट लावल्याने या मतदारसंघात भाजपला यश मिळाले.

संबंधित बातम्या