फुटबॉलचे आश्रयदाते पीटर वाझ यांचे निधन

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

उद्योजक आणि फुटबॉलचे आश्रयदाते पीटर वाझ यांचे कोविडमुळे बंगळूर येथील इस्पितळात निधन झाले.

पणजी: उद्योजक आणि फुटबॉलचे आश्रयदाते पीटर वाझ यांचे कोविडमुळे बंगळूर येथील इस्पितळात निधन झाले. त्यांना सुरवातीला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीची गुंतागुंत वाढल्याने नंतर बंगळूर येथील इस्पितळात हलवण्यात आले होते.
मॉडेल्स कन्ट्रक्शन व स्पोर्टिंग क्लब ऑफ गोवामुळे पीटर वाझ सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाबद्दल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या