पणजीतील पाटोचा होणार कायापालट!

27 कोटींचे प्रकल्प; ऑगस्टमध्ये कामाला प्रारंभ
Patto
Patto Dainik Gomantak

पणजी : कदंब बसस्थानकाजवळील पाटो परिसरातील काही भागाचा लवकरच कायापालट होणार आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) कंपनी या परिसरात 27 कोटींचे दोन प्रकल्प उभारणार आहे. ऑगस्टमध्ये कामाला सुरवात होणार असून संस्कृती भवनाच्या बाजूला व स्टेट बँकेच्या मागील बाजूस प्रकल्प उभारले जातील. १७ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची अट संबंधित कंत्राटदारास घालण्यात आली आहे.

आयपीएससीडीएलने संस्कृती भवनामागे रुआ दी ओरेम खाडीत खारफुटीत केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत ‘मँग्रोव्ह बोर्डवॉक’ ची निर्मिती केली होती. 2018 मध्ये ते काम पूर्ण झाले आणि 2020 मध्ये महापालिकेकडे ते सुपूर्द करण्यात आले आहे. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत संस्कृती भवनाच्या मागील बाजूस खाडीवर मळा ते पाटो परिसर जोडणाऱ्या दुसऱ्या पुलाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.

स्त्री हीच भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा

या पुलाच्या जवळच उत्तरेला तथा एसबीआय इमारतीमागे आयपीएससीडीएल औषधी वनस्पतींचे वनस्पती उद्यान (बोटॅनिकल गार्डन), तसेच मुलांसाठी बालोद्यान विकसित केला जाणार आहे. त्यामध्ये स्केट पार्क आणि चढाईसाठी कलात्मक भिंतीचा (आर्टिफिशयल क्लायम्बिग वॉल) समावेश असणार आहे. तसेच याठिकाणी शौचालय, विश्रांती कक्ष आणि उद्यानातील साहित्य ठेवण्यासाठी स्टोअररूम असेल. पाटोवरील ‘सेसा घर’समोरून रस्ता या ठिकाणी जाण्यासाठी असणार आहे. सध्याचा ‘मँग्रोव्ह बोर्डवॉक’ हा पुढे जुन्या पदपुलापर्यंत नेला जाणार आहे.

पर्यटकांची सोय

जुन्या पाटो पुलाजवळ लोखंडी रेलींगच्या साह्याने सांता मोनिका जेटीपर्यंत पदपथ निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे जेटी परिसरात येणाऱ्या पर्यटकांना चालत येणे शक्य होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com