शेती लागवडीकडे लक्ष द्या : डाॅ. शेट्ये

डिचोलीत शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप
Dr. Chandrakant Shetye
Dr. Chandrakant ShetyeDainik Gomantak

डिचोली : युवा पिढीने शेती व्यवसायात उतरून कृषी क्षेत्रात भारत देशाला समृद्ध बनविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले आहे. कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी अधिकाधिक शेती लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Dr. Chandrakant Shetye
वेळसाव येथे रेल्वेचे बॅरीकेटींग काम रोखले

शिक्षा व्हीजनच्या माध्यमातून मंगळवारी (ता. 21) डिचोलीतील शेतकऱ्यांना खत आणि भात बियाण्यांचे वाटप करताना आमदार डॉ. शेट्ये यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. डिचोली पालिका क्षेत्रातील व्हाळशी, बोर्डे आणि लामगाव या भागात आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमात तेथील शेतकऱ्यांना आमदारांच्या हस्ते खत आणि बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक गुंजन कोरगावकर, शिक्षा व्हिजनचे डॉ. दिनेश आमोणकर, नारायण बेतकीकर, ऍड. रोहन शिरोडकर, आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शिक्षा व्हीजनतर्फे साळ आणि मेणकूरे भागातील जवळपास 500 शेतकऱ्यांना खत आणि बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com