उसाला प्रतिटन ३६०० रुपये दर द्या

उसाला प्रतिटन ३६०० रुपये दर द्या
उसाला प्रतिटन ३६०० रुपये दर द्या

सांगे:  सरकार यंदा उस तोडणी करण्यास राजी नसल्यास उभ्या उसाला प्रतिटन ३६००/- रुपये दर द्यावा, पुढच्या वर्षी कारखाना चालू करणार असल्यास लेखी स्वरूपात द्यावे व कारखाना बंद करणार असल्यास दहा वर्षांची नुकसान भरपाई देणार असल्याचेही लेखी स्वरूपात द्यावे, असा महत्त्वपूर्ण ठराव आज वाडे कुर्डी व्ही. के. एस. सोसायटीने बोलाविलेल्या शेतकऱ्यांच्या सभेत एकमताने घेण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी हात उंचावून या ठरावाला अनुमोदन दिले. चंदन उनंदकर यांनी हा ठराव मांडला होता.

संजीवनी सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सरकार अद्याप ठोस निर्णय घेत नसल्याने वाडे कुर्डी व्ही. के. एस. सोसायटीने शेतकऱ्यांची ही सभा बोलावली होती.

दरम्यान, सरकाने २० सप्टेंबरपर्यंत निर्णय कळवावा अन्यथा पुढील निर्णय घेण्यासाठी शेतकरी मोकळे असतील असेही ठरावात स्पष्ट केले आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन आयेतीन मास्कारेन्हस, उपचेअरमन मनोज पर्येकर, ऊस उत्पादक संजय कुर्डीकर व शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष तथा प्रगतशील ऊस उत्पादक हर्षद प्रभुदेसाई उपस्थित होते. 

ऊस तोडणीसाठी यंदा मजूर मिळणे कठीण असून शेतकरी त्रासात पडू नये म्हणून सर्वांच्या सहमतीने निर्णय घेणे, कारखाना दुरुस्ती करून चालविणे शक्य नसल्याचे सरकार सांगते, शिवाय तीन वर्षे तरी नवीन कारखाना होणे नाही अशा स्थितीवर यंदा गळीत हंगामासंदर्भात अद्याप सरकार निर्णय घेत नाही. शेतकरी संघटना पाठपुरावा करीत आहे, पण सरकार प्रतिसाद देत नाही. यामुळे शेतकरी आणि शेतकऱ्यांची संस्था अडचणीत येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावा म्हणून ही बैठक बोलाविली होती, असे यावेळी वाडे कुर्डी व्ही. के. एस. सोसायटीचे चेअरमन आयेतीन मास्कारेन्हस यांनी स्पष्ट केले.

चंदन उनंदकर यांनी आपले विचार मांडताना वरील ठराव मांडला असता सभेने मंजुरी दिली. यावेळी त्यांनी सरकारने कारखाना बंद करणार म्हणून नोटीस देत नसताना शेतकऱ्यांनी आगाऊपणा केल्यास जसे साळावली धरणग्रस्त लेखी स्वरूपात सरकारने देऊनसुद्धा आज चाळीस वर्षे न्याय मिळविण्यासाठी हेलपाटे मारीत आहे. तीच स्थिती निर्माण होणार आहे म्हणून योग्य निर्णय होईपर्यंत ऊस शेती सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले. 

दशरथ गावकर म्हणाले, की कारखाना सुरू करण्यासाठी रस्त्यावर बसावे लागते. रक्कम मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागते, हा दुर्दैवी प्रकार आहे. वाडे कुर्डीचे उपसरपंच कुष्ठ गावकर यांनी संजीवनी दुरुस्ती करून चालविण्याची मागणी केली. पावटो गावकर यांनीही आपले मत मांडले.  मनोज पर्येकर यांनी सुरवातीला प्रास्ताविक केले. या सभेला दोनशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते.

goa

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com