पेडणे लोकमान्य गणेशोत्सव मंडळाकडून सॅनिटायझरचे वाटप

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

लोकमान्य गणेशोत्सव मंडळातर्फे पेडणे बाजारपेठेतील व्यापारी, दुकानदार, मोटारसायकल पायलट, टॅक्सी, टेम्पो व रिक्षाचालकांना प्रत्येकी अर्धा लिटर सॅनिटायझर व मास्कचे वितरण करण्यात आले.

पेडणे: येथील लोकमान्य गणेशोत्सव मंडळातर्फे पेडणे बाजारपेठेतील व्यापारी, दुकानदार, मोटारसायकल पायलट, टॅक्सी, टेम्पो व रिक्षाचालकांना प्रत्येकी अर्धा लिटर सॅनिटायझर व मास्कचे वितरण करण्यात आले. मंडळाच्या सभासदांनी स्वतः संपूर्ण बाजारपेठ फिरून सुमारे ४०० जणांना हे वाटप केले. 

गेली २३  वर्षे  मंडळाला या सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल यावेळी त्यांचे मंडळावतीने आभारही मानले. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंडळाने यापूर्वीच आपला २४ वा गणेश उत्सव यंदा दिड दिवस साजरा केला. सॅनिटायझर व मास्कचे वाटप करताना रामा सावळ देसाई, जगदीश देशप्रभू, सुशांत मांद्रेकर, श्रीधर शेणवी देसाई, सदानंद सावळ देसाई, चंद्रकांत सांगळे, कांता आसोलकर, मोहन तळवणेकर, सदगुरू नागवेकर, विनय गुरव, नंदकिशोर साळगावकर आदी सभासद उपस्थित होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या