Vasco: "मुरगाव मतदारसंघातील प्रलंबित प्रकल्प येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार"- संकल्प आमोणकर

आ. संकल्प आमोणकर यांच्यासह जीएसआयडीसी, पीडब्ल्यूडी, विद्युत विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अमोनिया रस्ता ते बायणा पूलापर्यन्त कामाची पाहणी केली.
Vasco
VascoDainik Gomantak

मुरगावचे आमदार संकल्प अमोणकर यांनी गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, महामंडळाचे व्यवस्थापक ज्यूड कारव्हालो, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकामचे सहाय्यक अभियंते विन्सेंट डिसोजा, वीज सहाय्यक अभियंते विपेश नाईक, मूरगाव भाजप मंडळ अध्यक्ष संजय सतार्डेकर, मूरगाव भाजप निरीक्षक जयंत जाधव यांच्या उपस्थितीत सडा जंक्शन ते बायणा पुलापर्यंत रस्ता रुंदीकरण आणि हाॅट मिक्सिंगच्या कामांनागती देण्यासाठी संयुक्त पाहणी केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमोणकर म्हणाले की, हा प्रकल्प ३१.३५ कोटी रुपयांना मंजूर करण्यात आला होता आणि एका कंत्राटदाराला देण्यात आला होता, ज्याने प्रकल्प पूर्ण केला नाही आणि तो प्रलंबित ठेवला."आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला आहे आणि या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्यासाठी आणि रस्त्याचे हॉटमिक्सिंग पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बोगदा स्मशानभूमी ते जेट्टीपर्यंतच्या रस्त्याच्या कडेला पेव्हरचे काम पूर्ण झाले आहे आणि आता आम्ही पुढील काम पूर्ण करू,"असे आमोणकर म्हणाले.

Vasco
Sanjivini Sugar Factory: भाऊसाहेबांचा वारसा नष्ट होऊ देणार नाही; आलेमाव यांचा सरकारला इशारा

"पुलापासून रवींद्र भवनापर्यंत या रस्त्याच्या डाव्या बाजूला पेव्हर टाकण्याचे काम प्रलंबित आहे, मधला मुख्य भाग सडा आणि पूल महामार्ग प्राधिकरणांच्या अंतर्गत येतोय आणि गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे कामे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रकल्प आता सुमारे २६ कोटी रुपयांपर्यंत सुधारित करण्यात आला आहे." असे आमोणकर म्हणाले.

Vasco
Mahadayi Water Dispute: 'म्हादई'प्रश्नी अमित शाह यांनी गोव्याला दिलेले आश्वासन म्हणजे 'डबल गेम'

"आम्ही प्रलंबित प्रकल्प येत्या दोन महिन्यांत पूर्ण करू अशी आशा आहे. आम्हाला सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कडून सडा येथील प्रभाग १ ते प्रभाग ५ या अंतर्गत रस्त्यांना हॉटमिक्स करण्यासाठी मंजुरी मिळेल."असे आमोणकर शेवटी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com