प्रलंबित चाचण्‍या ठरताहेत ‘भय’कारी

Tejshri Kumbhar
शुक्रवार, 31 जुलै 2020

राज्यात कोरोना संसर्ग आणि रुग्‍णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. यासंदर्भात आता गांभीर्याने पाऊले उचलणे गरजेचे झाले आहे. काहीजण इतरत्र बेजबाबदारपणे फिरत असले, तरी अनेकजण जबाबदारीने चाचण्या करण्यासाठी पुढे येत आहेत. असे असले तरी चाचण्यांचे अहवाल मात्र वेळेत मिळत नसल्याचे उघड होत आहे. गेल्या दहा दिवसांत कोरोना पडताळणी चाचण्यांचे प्रलंबित अहवाल सरासरी दिवसाला ४ हजार एवढे आहे. तर प्रतिदिन १५०० अहवाल तपासले जात आहेत.

तेजश्री कुंभार

पणजी :

राज्यात कोरोना संसर्ग आणि रुग्‍णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. यासंदर्भात आता गांभीर्याने पाऊले उचलणे गरजेचे झाले आहे. काहीजण इतरत्र बेजबाबदारपणे फिरत असले, तरी अनेकजण जबाबदारीने चाचण्या करण्यासाठी पुढे येत आहेत. असे असले तरी चाचण्यांचे अहवाल मात्र वेळेत मिळत नसल्याचे उघड होत आहे. गेल्या दहा दिवसांत कोरोना पडताळणी चाचण्यांचे प्रलंबित अहवाल सरासरी दिवसाला ४ हजार एवढे आहे. तर प्रतिदिन १५०० अहवाल तपासले जात आहेत.

गेल्या काही दिवसांत कोरोना पडताळणी अहवाल वेळेत न आल्याने सकारात्मक रुग्ण इकडेतिकडे फिरत होता, किंवा पळून गेला अशा घटना राज्यात घडल्या आहेत. राज्यात असणारी कोरोना पडताळणी चाचणीसाठीची यंत्रणा आणताना अवघ्या काही तासांत कोरोना पडताळणी चाचणीचा अहवाल मिळणार, अशी जाहिरातबाजीही केली होती. मात्र, वस्‍तुस्‍थिती वेगळी आहे. याउलट ज्या रुग्णांना साधा ताप वातावरण बदलामुळे आलेला असतो, त्यांनाही चाचणी करण्यास सांगितले जाते. यावेळी चाचणीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत खासगी इस्पितळात उपचारासाठी भरती करून घेतले जात नाही आणि चाचणीचा अहवाल लवकर मिळत नसल्याने रुग्णालयाला ताटकळत आजारी अवस्थेत राहावे लागत असल्‍याचेही उघड झाले आहे. कोरोना पडताळणी चाचणीचा अहवाल लोकांपर्यंत लवकरात लवकर मिळणे आवश्‍‍यक आहे.

आणखी तीन बळी, तर २१५ पॉझिटिव्ह
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. तर २१५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. २२१ जण कोरोनामुक्त झाल्याने राज्यात एकूण १६५७ कोरोनाबाधित आहेत.

तारीख प्रलंबित अहवाल चाचण्यांचे मिळालेले अहवाल
२१ जुलै ३८१० १६१२
२२ जुलै ४८६६ १९५७
२३ जुलै ५४७६ २४०२
२४ जुलै ६२२७ १३८३
२५ जुलै ६८६० १६८३
२६ जुलै ६६३३ १५८६
२७ जुलै ६६१६ २१३३
२८ जुलै ५९३४ २०९१
२९ जुलै ५१८१ २३८७
३० जुलै ४८३२ १७७९

२४ तासांत ४८३२ अहवाल प्रलंबित
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ४८३२ जणांचे कोरोना पडताळणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. आजच्या दिवशी ४ देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ३९ जणांना ठेवण्यात आले. १४३० जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर १७७९ जणांचे अहवाल हाती आहेत. दरम्यान रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ६१ रुग्ण आहेत. डिचोलीत ४ रुग्ण, साखळीत ४३, पेडणेत ६, वाळपईत ९, म्हापसा येथे ४३, पणजीत ७६, बेतकी येथे ७, कांदोळीत ३९, कोलवाळ येथे ५४, खोर्ली येथे १५, चिंबल येथे ६६, पर्वरीत १९, कुडचडेत १२, काणकोण येथे ३, मडगावात १०७, वास्कोत ३९१, लोटलीत ४०, मेरशी येथे १८, केपे येथे ८, सांगे येथे ५, शिरोडा १४, धारबांदोडा येथे ३२, फोंडा येथे ९४, आणि नावेली आरोग्य केंद्रात २७ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

- महेश तांडेल

संबंधित बातम्या