किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरून गोव्यातील मच्छिमार संतप्त

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

गोव्यात सध्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरून जनता सरकारवर टीका करत आहे.

पणजी: गोव्यात सध्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरून जनता सरकारवर टीका करत आहे. हा आराखडा लागू केला की किनाऱ्यावरील पारंपारिक मच्छिमार फेकले जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सरकार मत्स्य उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत असले तरी राज्यातील मत्स्य उत्पादनात गेल्या वर्षी 17 टक्के घट झाली आहे सरकारच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात एक लाख पाच हजार 547 टन मासळी पकडण्यात आली त्यापूर्वीच या वर्षात 1 लाख 20 हजार 284 टन मासळी पकडण्यात आली होती. यंदा मासळी पकडण्यात आणखीनही घट होण्याची शक्यता आहे. गेल्या जानेवारी पर्यंत केवळ 78 हजार 249 टन मासळी पकडण्यात आलेली आहे. मासळी हे गोमंतकीयांचे मुख्य अन्न मानले जाते. यामुळे समुद्राबरोबर हे गोव्यातील नद्यांत मासेमारी चालते. पावसाळ्यातील मासेमारी बंदीच्या काळातही खाडी आणि नदीतील मासेमारी पारंपरिक पद्धतीने सुरू असते.

अखेर गोवाच्या किनारी पर्यटकांवर पोलिसांची कारवाई सुरू 

संबंधित बातम्या