‘आप’च नोकऱ्या देईल यावर गोमंतकीयांचा विश्वास!

गोव्यातील लोकांना 'आप'ची संकल्पना आवडली त्यामुळेच ‘आप’च्या रॅलीत युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत
‘आप’च नोकऱ्या देईल यावर गोमंतकीयांचा विश्वास!
People believe that Aam Aadmi Party will give jobs to people of GoaTwitter/ @AAPGoa

केपे: आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सर्वांना नोकऱ्या (Job in Goa) ही संकल्पना गोव्यातील लोकांना आवडली आहे. त्यामुळेच ‘आप’च्या रॅलीत युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे संभावित उमेदवार प्रशांत नाईक (Prahsant Naik) यांनी व्यक्त केली.

People believe that Aam Aadmi Party will give jobs to people of Goa
करंझाळे रस्ता वाद पेटला: आप मोन्सेरोत आमने-सामने

कुंकळ्ळी मतदारसंघात आयोजित केलेल्या सोमवारच्या रॅलीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. केजरीवाल यांचा संदेश मतदारसंघातील सर्व युवकांमध्ये पोहोचावा यासाठीच या रॅलीचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

आज गरजवंतांना नोकऱ्या देण्यास भाजप सरकार अपयशी ठरले आहे. फक्त आपल्या सग्या सोयऱ्यांना व कार्यकर्त्यांना नोकऱ्या देण्यात भाजप व्यग्र आहे. पण, आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास गरीब व गरजवंतांना नोकऱ्या देण्यास प्राधान्य देणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. आम आदमी पक्षावर विश्वास असल्याने आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या पक्षाकडे आकर्षित होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

People believe that Aam Aadmi Party will give jobs to people of Goa
People believe that Aam Aadmi Party will give jobs to people of GoaTwitter/ @AAPGoa

आम आदमी पक्ष यावेळी कुंकळ्‍ळी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे. या मतदारसंघातली सर्व गावांत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असून, ते दिवसरात्र पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगून या मतदारसंघाचा विद्यमान आमदार विकासकामे करण्यास अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

People believe that Aam Aadmi Party will give jobs to people of Goa
Goa: ‘आप’च्या रॅलीत युवकांचा वरचष्मा

रॅलीत सुमारे 500 युवकांनी सहभाग घेतला. बाळ्ळी येथून सुरुवात झालेली रॅली देमानी, कुंकळ्ळी या मार्गाने जाऊन पांजरखणी येथे समाप्‍त झाली. यावेळी प्रत्येक ठिकाणी कोपरा बैठका घेण्यात आल्या. या रॅलीच्या निमित्ताने प्रशांत नाईक यांनी जबरदस्त शक्‍तिप्रदर्शन करून मतदारसंघातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com