जरा थांबा, आणखी लोक तृणमूल काँग्रेस पक्षात येतील: फालेरो

भाजपाशी (BJP) पूर्ण ताकदीने फक्त तृणमुल काँग्रेसच (Trinamool Congress) लढा देऊ शकते हे आता गोव्यातही (Goa) लोकांना कळले आहे.
Luisin Falero
Luisin FaleroDainik Gomantak

मडगाव: भाजपाशी (BJP) पूर्ण ताकदीने फक्त तृणमुल काँग्रेसच (Trinamool Congress) लढा देऊ शकते हे आता गोव्यातही (Goa) लोकांना कळले आहे. जरा थांबा पुढच्या आठवड्यापर्यंत या पक्षात गोव्यात आणखीही लोक प्रवेश करणार हे ध्यानात ठेवा असे संकेत नावेलीचे आमदार लुईझीन फालेरो (Luisin Falero) यांनी दिले. आज आपल्या मडगाव येथील निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. गोव्यात कित्येक समस्या आहेत. राज्य आर्थिक संकटात सापडले आहे, पर्यावरणावर हे सरकार दिवसाढवळ्या घाला घालत आहे. मात्र दुर्दैवाने त्यावर कुणी आवाज उठवीत नाही. अशा अन्याया विरुद्ध केवळ ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसच आवाज उठवू शकतो. लुईझीन फालेरो हा थोडा म्हातारा झालेला असेल तर त्याच्यामधली 'फायटर' वृत्ती संपलेली नाही. गोवेकारांचे प्रश्न घेऊन लढण्यासाठीच आपण तृणमुल काँग्रेस पक्षात सामील होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Luisin Falero
Goa Politics: फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर काय...

मागची 40 वर्षे मी काँग्रेस पक्षात आहे. काँग्रेस पक्षाशी धोरणे आणि तत्वे माझ्या रक्तात भिनली आहेत. महात्मा गांधी यांनी एक चळवळ म्हणून सुरू केलेल्या काँग्रेसचे आता सोनिया काँग्रेस, शरद पवार काँग्रेस, व्हायएसआर काँग्रेस अशी चार छकले पडली आहेत. या चारही काँग्रेस परत एकत्र येऊन भाजपच्या विरोधात संघटित लढा देण्याची गरज आहे. काँग्रेस पूर्वीसारखी एकसंघ व्हावी यासाठीच मी तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. यासाठी गोव्यात मी प्रयत्न करणार तर केंद्रात तृणमुलचे केंद्रीय नेते प्रयत्न करणार असे आपल्याला आश्वासन मिळाले आहे असे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.

यावेळी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनीच फालेरो यांचे खच्चीकरण केल्याने फालेरो यांच्यावर हा निर्णय घेण्याची वेळ आली असा दावा फालेरो समर्थक असलेले दक्षिण गोवा काँग्रेस जिल्हा समितीचे सचिव झाकारीस गोईस यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com