''मुरगावातील जनता भाजपच्या उमेदवारांना विजयी करेल''

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी होणार आहे.

दाबोळी: गोव्यातील ग्रामीण भागातील जनतेने जसे जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला उत्तर व दक्षिणेत यश दिले होते, त्याचप्रमाणे राहिलेल्या पाच नगरपालिकेत भाजप पुरस्कृत उमेदवारांना शहरी भागातील जनता मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. वास्को मतदारसंघातील मुरगाव नगरपालिका निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवाराला जाहीरनाम्याचे प्रकाशनावेळी वरील माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी त्यांच्या समवेत वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा व भाजप पुरस्कृत उमेदवार प्रभाग 11 नारायण बोरकर, प्रभाग 12 माजी नगराध्यक्ष दीपक नाईक, प्रभाग 13 शलाका कांबळी, प्रभाग 14 मोंन्तेरो मथायस (मोती), प्रभाग 15 प्रिया राऊत, प्रभाग 16 सुधीर धारगळकर, प्रभाग 17 माजी नगरसेवक फेड्रिक हेंन्रीक्स, प्रभाग 18 अमय चोपडेकर, प्रभाग 19 देविता आरोलकर, प्रभाग 20 माजी नगरसेवक यतीन कामूर्लेकर, प्रभाग 21 श्रद्धा महाले उपस्थित होते. ("People of Murgaon will win BJP candidates")

गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यातील उत्तर व दक्षिणेत ग्रामीण भागातील जनतेने ज्याप्रमाणे भाजपच्या उमेदवारांना विजयी केले, त्याच पद्धतीने मुरगाव, सांगे, म्हापसा, मडगाव, केपे नगरपालिकेतील मतदार भाजप पुरस्कृत उमेदवारांना विजयी करणार आहे. स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत पंचायती बरोबर नगरपालिका क्षेत्रात आणखी जास्त साधन सुविधा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यात राज्यातील सर्व घरे कायदेशीर करण्याबरोबर सर्वांना वीज, पाणी देण्यावर सुद्धा राज्य सरकार स्वयंपूर्ण योजनेअंतर्गत कार्य करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. 

गोवा: सरकारच्या दबावाला झुगारुन पुन्हा आजाद मैदानावर आंदोलन...

याप्रसंगी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले की, मुरगावचे आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक दाबोळीचे आमदार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या सहकार्याने मुरगाव नगरपालिकेत भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी होणार आहे. आम्ही तिन्‍ही भाजपचे आमदार एकत्र असून आमच्यामध्ये दुही असल्याची चुकीची माहिती विरोधी देत आहे.

संबंधित बातम्या