गोवेकरांनी कोरोनाच्‍या चौथ्या लाटेसाठी सतर्क राहण्याची गरज: डॉ. गीता काकोडकर

लसीकरणासह नियमावलीचे पालन करण्याचे आरोग्य प्रशासनातर्फे संदेश
 Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

पणजी : सध्या राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी रोज वाढत चाललेल्‍या रुग्णांच्या संख्‍येवरून आपण कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे आवाहन आज गोवा आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. प्रामुख्याने लसीकरण करण्याबरोबरच कोरोना नियमावलीचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन आरोग्य संचालका डॉ. गीता काकोडकर यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी लसीकरण प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर, कोरोना कृतिदल कमिटीचे सदस्य डॉ. उत्कर्ष बेतोडकर उपस्थित होते. (Fourth Wave of Corona in Goa)

 Goa Corona Update
कदंब महामंडळ कात टाकणार; गोवेकरांच्या सेवेत नवीन बस दाखल होणार

राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी रोज दहा ते पंधरा बाधित रुग्ण सापडत आहेत. कदाचित कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा हा शेवट असावा किंवा चौथ्या लाटेची सुरुवात असावी, मात्र रोज रुग्ण वाढत आहेत. यासाठी नागरिकांनी सतर्कतेचा उपाय म्हणून कोरोना नियमावलीचे पालन करावे. त्‍यात प्रामुख्याने मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सॅनिटायझरने हात स्‍वच्‍छ ठेवणे याची अंमलबजावणी करावी. सध्यातरी कोरोनासाठी लसीकरण हा प्रभावी मार्ग स्पष्ट झाला आहे. आता लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती डॉ. बोरकर यांनी दिली.

सध्या 12 ते 14 आणि 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. त्‍यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय 18 वर्षांवरील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण झालेले गोवे हे एकमेव राज्‍य आहे. लसीकरणाचा बूस्टर डोस अद्याप ज्या व्यक्तीने घेतलेला नाही, त्यांनी तो तातडीने घ्यावा. शिवाय जे रुग्ण इतर आजाराने बाधित आहेत किंवा इतर रोगांशी मुकाबला करत आहेत अशांनी प्राधान्याने बूस्टर डोस घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि सतत नागरिकांच्या संपर्कात असलेले फ्रंटलायनर यांनीही बूस्टर डोस घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्‍या काही दिवसांत राज्‍यात पुन्‍हा कोरोना रुग्‍णांची संख्‍या वाढू लागली असून, ही निश्‍चितच चिंताजनक गोष्‍ट आहे. मात्र ही चौथ्‍या लाटेची सुरूवात आहे असेही ठामपणे म्‍हणता येणार नाही. पण लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने लसीकरण करण्याबरोबरच कोरोना नियमावलीचे नागरिकांनी पालन करावे.

- डॉ. गीता काकोडकर, आरोग्य संचालका

राज्यात सध्या कोरोना पूर्णत: नियंत्रणात आहे. मात्र बाधित रुग्ण संख्या वाढत आहे. ही चौथी लाट आहे का, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. यासाठी काही नमुने आम्ही इतर प्रयोगशाळांना पाठविलेले आहेत. मात्र ते अद्याप येणे बाकी आहे. ते आल्यावर निश्चित माहिती मिळेल. तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी.

- डॉ उत्कर्ष बेतोडकर, सदस्य, कोरोना कृतिदल समिती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com