आमच्यावरील घटले मागे घ्या; मेळावलीवासीय एकवटले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणेंना मेळावलीतील नागरिकांचं आवाहन
आमच्यावरील घटले मागे घ्या; मेळावलीवासीय एकवटले
People of Melauli protesting Dainik Gomantak

पणजी : भाजयुमो राष्ट्रीय सचिव ताजिंदर सिंग बग्गाला पंजाब पोलिसांकडून अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यानंतर सत्तरीतील मेळावलीवासीयांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे सरकारने मागे घेण्याची मागणी मेळावलीवासीयांनी केली आहे.

People of Melauli protesting 
जंगलात सापडला महिलेचा मृतदेह; कुडचडे पोलिसांकडून तपास सुरू

सत्तरी तालुक्यातील मेळावलीत प्रस्तावित आयआयटी कॅम्पसविरोधात स्थानिकांनी एल्गार पुकारला होता. या आंदोलनामुळे सरकारला मेळावलीतील हा प्रकल्प गुंडाळावा लागला होता. प्रकल्प रद्द झाला तरी आंदोलनावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे अजूनही रद्द करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आक्रमक झालेल्या मेळावलीवासियांनी मुख्यमंत्र्यांकडे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली आहे.

People of Melauli protesting 
रेल्वे दुपदरीकरणाला स्थगिती हा गोव्याच्या अस्मिता रक्षणकर्त्यांचा विजय - दिगंबर कामत

कुणीतरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणेंना विचारा की अजूनही मेळावलीवासीयांवर अन्याय का होतो आहे? चुकीच्या कारणामुळे मेळावलीवासीयांवर गुन्हे दाखल आहेत, ते कधी मागे घेणार असा संतप्त सवाल मेळावलीवासीय विचारत आहेत. तसंच आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या असं आवाहनही विश्वजीत राणेंना स्थानिकांनी केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.