पर्वरी परिसरातील लोकांना रुग्णवाहिकेची नितांत गरज

Datta Shirodkar
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

पर्वरी परिसरात कुठेही छोटे-मोठे अपघात झाले असता ती तत्परतेने घटनास्थळी पोहचून लोकांचे प्राण वाचवत असे. पण, आता ही रुग्णवाहिका सरकारने अचानक काही कारणास्तव तिला बांबोळी येथील वैद्यकीय इस्पितळात हलविल्याने येथील लोकांची बरीच गैरसोय होत आहेत

पर्वरी,  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सरकारतर्फे १०८ रुग्णवाहिका देण्यात आली होती. त्या रुग्णवाहिकेचा पर्वरी परिसरातील लोकांना खूप फायदा होत होता. पर्वरी परिसरात कुठेही छोटे-मोठे अपघात झाले असता ती तत्परतेने घटनास्थळी पोहचून लोकांचे प्राण वाचवत असे. पण, आता ही रुग्णवाहिका सरकारने अचानक काही कारणास्तव तिला बांबोळी येथील वैद्यकीय इस्पितळात हलविल्याने येथील लोकांची बरीच गैरसोय होत आहेत. सरकारने ती परत पर्वरी आरोग्य केंद्रात द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
आमदार रोहन खंवटे सरकारचे घटक होते. त्यावेळी त्यांच्या प्रयत्नाने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रयत्नाने एका रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आली होती. पण, आज आमदार खंवटे सरकारच्या ध्येय धोरणावर गंभीर टीका करतात. सरकारच्या विरोधात उघडपणे बोलतात. त्याचा परिणाम म्हणून ही रुग्णवाहिका काढून घेतली का असा संशय ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहे.
काहीही असो, पर्वरी परिसर झपाट्याने शहरीकरणाकडे झुकत आहे. त्यात ‘कोविड-१९’ या महामारीने पर्वरी उच्छाद मांडला आहे. दिवसेंदिवस या महामारीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा मोक्याच्या वेळी या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची सोय असणे नितांत गरजेचे आहे. सरकारचे रुग्णवाहिका हलविण्यामागे राजकारण असेल तर तूर्त या घडीला ते मागे ठेवावे व पर्वरी आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका परत द्यायला हवी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

 

 

संबंधित बातम्या