समुद्रस्‍नानाऐवजी लोकांचा कल गोड्या पाणस्रोतांकडे

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

खांडेपार, गांजे, दुधसागर नद्यांत डुंबण्‍याचा निवडला पर्याय : टाळेबंदीतही लुटताहेत स्‍नानाचा आनंद

फोंडा

टाळेबंदीमुळे बहुतेक लोकांना समुद्रस्‍नान करता आले नसल्याने लोकांनी आपला मोर्चा आता गोड्या पाण्याच्या नाल्यांकडे वळविला. खांडेपार, गांजे, दुधसागर नद्यांतील पाण्‍यात मनसोक्‍त डुंबण्‍याचा आनंद लोक टाळेबंदीच्‍या काळातही लुटत आहेत.
फोंडा तालुक्‍यात व जवळपासच्या क्षेत्रात कित्येक ठिकाणी ओढे, नाले, ओहळाचे पात्र गोड्या पाण्याने वाहताना दिसून येत आहे. मात्र, समुद्रस्नान हे माणसाच्या आरोग्याला औषधदायक असते. त्यामुळे लोकांचा ओढा उन्हाळ्यात समुद्राच्‍या खाऱ्या पाण्यात आंघोळ करण्याकडे असतो. समुद्रस्नान करण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावताना दिसतात. टाळेबंदीमुळे यंदा पर्यटक संख्या कमी प्रमाणात दिसून आली. ग्रामीण भागातील लोकांनी समुद्रस्नानाऐवजी गोड्या पाण्याची पसंती दिली.
धारबांदोडा व फोंडा तालुक्‍याच्या विविध ठिकाणी नदीच्या पात्रात बंधारे बांधण्यात आले असून ऐन पावसाच्या तोंडावर बंधाऱ्याचे पाणी नदीच्या पात्रात सोडले जात आहे. यंदा समुद्राचे पाणी वृद्धांना तसेच तरुणांना घेता आले नसल्याने लोकांना अतिउष्णतेमुळे ओढ्याकडील गोड्या पाण्याकडे वळले. खांडेपार नदीचे खाऱ्या पाण्याचे पात्र खांडेपार पुलापर्यंत, तर म्हादई नदीचे पात्र गांजे येथून वाहत आहे. खाऱ्या पाण्याचे स्नान करण्याच्या या दोन्ही नदीचा वापर आंघोळीसाठी करताना दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात गोड्या पाण्यात स्नान करून वेगळाच आनंद लुटताना युवा वर्ग दिसून येत आहे. युवकांना गोड्या पाण्याचा अंदाज मिळत नसल्याने नदीच्या पात्रात बुडून दुर्घटना होण्याच्‍याही घटना घडत आहेत.

 

 

संबंधित बातम्या