वास्कोतील जनतेला कोळसा प्रदुषणापासून मुक्त करावे

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

मुरगाव बंदरात आयात होणाऱ्या कोळशामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण माजलेले आहे. या कोळशाची निर्यात रस्ता आणि रेल्वे मार्गाने केली जात असल्याने कोळसा प्रदूषणाचा विळखा राज्यभर पसरला आहे. 

मुरगाव: भारतीय स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करतानाच राज्य सरकारने वास्कोतील जनतेला कोळसा प्रदुषणापासून मुक्त करावे, अशी मागणी हेडलॅन्ड-सडा येथील समाजकार्यकर्ते शंकर पोळजी यांनी केली आहे.

मुरगाव बंदरात आयात होणाऱ्या कोळशामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण माजलेले आहे. या कोळशाची निर्यात रस्ता आणि रेल्वे मार्गाने केली जात असल्याने कोळसा प्रदूषणाचा विळखा राज्यभर पसरला आहे. 

राज्यातील नद्यांचाही कोळसा निर्यातीसाठी वापर करण्याची तयारी सुरू झाली आहे. 

यामुळे संपूर्ण राज्य कोळशाने व्यापले जाणार असून, सर्वत्र प्रदूषणाचा हाहाकार माजणार आहे. यामुळे प्राणघातक रोगराई पसरेल, अशी भीती शंकर पोळजी यांनी व्यक्त करून, राज्य सरकारने कोळसा आयातीवर बंदी आणून गोवेकरांना कोळसा प्रदूषणापासून मुक्त करावे अशी मागणी केली.

‘गोंयचो आवाज या संघटने’ने जेटी येथे बॅनर्स फडकावून कोळसा आणि रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यावेळी श्री. पोळजी बोलत होते.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या