गोव्यातील सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट्सच्या दुकानाला शौकिनांच्या लाईक्स!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

बदलत्या काळामध्ये समाजाची विचारसरणी बदलत चालली आहे. म्हणूनच की काय भारतात प्रथमच गोवा राज्यातील  कॅलंगुटमध्ये सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट्सचे दुकान उघडले आहे.  

पणजी: भारतात लैंगिक संबंधांबद्दल बोलणे ही एक सामाजिक बंदी समजली जाते सेक्स या विषयावर बोलणे सुद्धा चुकीचे समजले जाते. यावर उघडपणे बोलण्यास लोक आमि वेशेषत: महिला नेहमीच टाळाटाळ करतात, परंतु जर गोष्ट सेक्स टॉयबद्दल असेल तर अजून लोक अजूनच संकोच बाळगतात. हे सेक्स टॉय पाश्चात्य देशांमध्ये अधिक प्रचलित आहे, परंतु बदलत्या काळामध्ये समाजाची विचारसरणी बदलत चालली आहे. म्हणूनच की काय भारतात प्रथमच गोवा राज्यातील  कॅलंगुटमध्ये सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट्सचे दुकान उघडले आहे.  

विशेष म्हणजे सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्टची विक्री करणारे हे भारतातील पहिले मान्यता प्राप्त दुकान आहे. त्याचबरोबर या दुकानेच्या नावाने देखील ग्राहक वर्ग आकर्षित झाला आहे. 'कामा गिजमोस' असे या दुकानाचे नाव आहे. या वर लोकांनी खूप सकारात्मक कमेंट दिल्या असून या शॉप ला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. सोशल मिडियावर या शॉपचे फोटो शेअर केले जात असून त्याला सकारात्मक कॅप्शन देण्यात आले आहे. . 'कामा गिजमोस नावाने दुकान मालकाने इंस्टाग्राम अकाउंट ओपन केले आहे. त्यावर लोकांना त्याच्या या उपक्रमाला दाद दिली आहे. 

बदलत्या जिवनशैलीनुसार हा बदल होणे खूप गरजेच आहे, त्याचबरोबर लैंगिक संमस्येबाबत समाजात जनजागृती व्हावी असे मत ही काही लोकांनी व्यक्त केले आहे. गोव्यातील लोकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. हे शॉप मान्यताप्राप्त असून या शॉपच्या मालकाने राजकीय वाद उद्भवू नये म्हणून मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दुकानाच्या भिंतीवर लावले आहे.
काहींनी आपल्या पर्सनल ट्विटर अकाउंट वर या दुकानाचे फोटो शेअर करत सेक्स टॉय या शॉप चे स्वागत केले आहे. वेलकम यू ऑल अस कॅप्शन ही या पोस्ट ला दिलं गेलं आहे. 

नवीन उत्पादनांचा पुरवठा करणार

भारतात अश्लीलतेविरूद्ध कठोर कायदे आहेत. हे लक्षात घेता भारतात  सेक्स टॉयचा व्यवसाय करणे अशक्य आहे. भारतात अशा दुकानांविषयी कायदा अजूनही स्पष्ट नाही परंतु आपण सेक्स प्रोडक्ट्स विकू शकतो जो पर्यंत ते  अश्लील असत नाही तोपर्यंत असे शॉप मालकाने सांगितले. या शॉपमालकांनी जाणीवपूर्वक अशी खेळणी आणि उत्पादने निवडली ज्यांचे पॅकेजिंग अश्लीलतेचे प्रदर्शन करीत नाही, असे सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे महिलांचा अपमान  होणार नाही किंवा त्यांना अश्लिल वाटेल असे कृत्य घडणार नाही याचे भान ठेवले असल्याचे दुकानाच्या मालकाने सांगितले आहे.

संबंधित बातम्या