पावसातही गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

पावसाची रिपरिप असतानाही गणेशासाठी बांधण्यात येणाऱ्या माटोळीकरिता लागणाऱ्या रानटी वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोक रेनकोट घालून छत्र्या घेऊन आल्याचे चित्र दिसत होते. काहीजण कुटुंबासह खरेदीसाठी आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पणजी: पावसाची रिपरिप असतानाही गणेशोत्सवासाठी माटोळी साहित्य खरेदीत लोकांचा उत्साह दिसून येत होता.  मांडवी किनाऱ्यावर माटोळी साहित्य विक्रीसाठी दुकाने थाटण्यास महापालिकेने परवानगी दिली होती. पावसातही लोक माटोळीचे साहित्य खरेदी करताना नजरेस पडत होते. 

खरेदीसाठी आलेल्या लोकांनी भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लागलेल्या रांगांवरून त्याचा आज दिवसभर अंदाज येत होता. सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू होती. पावसाची रिपरिप असतानाही गणेशासाठी बांधण्यात येणाऱ्या माटोळीकरिता लागणाऱ्या रानटी वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोक रेनकोट घालून छत्र्या घेऊन आल्याचे चित्र दिसत होते. काहीजण कुटुंबासह खरेदीसाठी आल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

दुसऱ्या बाजूला मिठाईच्या दुकानांतही खरेदीसाठी गर्दी दिसत होती. बाजारात सध्या सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी आयात केलेले नाही, उलट मागील वर्षी जे साहित्य होते, तेच साहित्य विक्रीस ठेवलेले दिसून आले. चीनमधील विजेवर चालणाऱ्या झिकझॅकच्या विद्युतमाळांची विक्री होत होती

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या