सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवू, बिगर सरकारी संस्थांचा इशारा

बिगर सरकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्तेसाठी पक्षांतर करू पाहणाऱ्या आमदारांचा निषेध
Peoples Protesting at Murgaon Nagarpanchayat
Peoples Protesting at Murgaon Nagarpanchayat Dainik Gomantak

मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी एकाच पक्षात राहून जनतेची सेवा करावी. सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात उडी घेणे टाळावे. असे केल्यास आम्ही जनता पुढच्या निवडणुकीत अशा उड्या मारून लोकांच्या मतांचा दुरुपयोग करणाऱ्या आमदारांना व इतर लोकप्रतिनिधींना योग्य तो धडा शिकवू असा निर्वाणीचा इशारा वेगवेगळ्या बिगर सरकारी संस्थांनी दिला.

सध्या काँग्रेसचे आमदार व इतर आमदार भाजपात प्रवेश करण्याच्या वाटेवर आहे. हे लोकांनी निवडून दिलेले आमदार लोकांचा विश्वासघात करून मंत्रीपदाच्या आशी पोटी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा घाट रचला आहे. याचा निषेध म्हणून आज वास्को पालिका इमारती समोर आमदारांनी चालवले ले हे नाटक यापुढे खपवून घेणार नसल्याचा इशारा दोन बिगर सरकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे धरून या आमदारांचा निषेध व्यक्त केला. हातात फलक घेऊन पक्षपात करणाऱ्या आमदारांना त्यांच्या कृत्याबद्दल निषेध करून त्यांना पुढच्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवण्याचा इशारा दिला. या बिगर सरकारी संस्थांचा निषेध धरणे कार्यक्रमात सवेराच्या तारा केरकर, आमच्या गोयाखातीरचे शंकर पोळजी, जयेश शेटगावकर, फादर बॉलमॅक्स पेरेरा, सावियो, अरविंद दोरादो, दामोदर नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Peoples Protesting at Murgaon Nagarpanchayat
Mapusa: गिरी म्हापसा सर्व्हिस रोडला भगदाड

समाजसेवक शंकर पोळजी यांनी जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनी जनतेची सेवा करण्याचे ध्येय धरावे. जनतेचा विश्वासघात करून पक्षपात करू नये. विरोधात राहूनच जनतेची सेवा करून दाखवा. या पक्षातून त्या पक्षात उडी मारून तुम्ही काय साध्य करणार. जनतेने एका पक्षाला कंटाळून तुमच्या बाजूने कौल दिला आहे. तो जनतेचा विश्वासघात करण्यासाठी नव्हे. असा इशारा त्यांनी दिला.

सवेराच्या तारा केरकर यांनी मतदार मतदान करताना विचारपूर्वक करतात. पण जनतेने निवडून दिलेल्या, आमदारच विश्वासघात करत असेल तर त्याचा काय फायदा. जनतेने निवडून दिले आहे जनतेची सेवा करा. अशा माकड उड्या मारू नका. असा सल्ला तारा किरकर यांनी दिला.

यावेळी इतरांनी आपले विचार मांडून पक्षपात करून बंडखोरी करणाऱ्या आमदारांना असला खेळ चालू ठेवल्यास घरचा रस्ता दाखवणार असल्याचे ते म्हणाले.

Peoples Protesting at Murgaon Nagarpanchayat
Goa Police बेस्ट! ज्येष्ठ नागरिकांना दिलं जातयं 'ज्येष्ठ नागरिक कार्ड'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com