आयआयटीसाठी लवकरच मिळणार कायमस्वरूपी संकुल

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : शिक्षणाचा उपयोग देश उभारणीसाठी व्हावा
Goa IIT
Goa IITDainik Gomantak

फोंडा: राज्यात आयआयटीला कायमस्वरूपी संकुल लवकरच उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्‍वासन देताना आतापर्यंत आयआयटी संकुल उभारण्यासाठी अनेक अडचणी आल्या, पण आता कोणत्याही स्थितीत आयआयटीसाठी नवीन संकुल शक्य तेवढ्या लवकर उपलब्ध केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

(Permanent complex for goa IITs statement by cm pramod sawant)

Goa IIT
आता घर बसल्या वीज बिल भरा!

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आज (शनिवारी) आयआयटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयआयटी गोवाचे प्रमुख बी. के. मिश्रा, खास निमंत्रित प्रा. देवांग खक्कर, उद्योजक नितीन कुंकळ्येकर तसेच आयआयटी गोवाचे प्रा. सचिन कोरे उपस्थित होते. आयआयटी गोवामध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध वर्गातील विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गोव्यात आयआयटी आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोठे प्रयत्न केले. गोमंतकीय युवकांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करताना गोवा सर्वचबाबतीत आत्मनिर्भर व्हावा यासाठी मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या प्रयत्नांचा पाठपुरावा करताना आता राज्यात आयआयटीसाठी कायमस्वरूपी संकुल उभारण्यासाठी कार्यवाही सुरू असून मागच्या काळात काही ठिकाणी विरोध झाला, पण आता लवकरच आयआयटीचे सुसज्ज संकुल उपलब्ध केले जाईल.

प्रा. देवांग खक्कर यांनी आयआयटी विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी पहिले प्राधान्य द्यावे असे सांगताना तंत्रज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार रहावे असेही सांगितले.

Goa IIT
नेत्रावळी येथील धबधब्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड

स्वागत व प्रास्ताविक प्रा. बी. के. मिश्रा यांनी करताना आयआयटीच्या माध्यमातून देशाच्या सेवेसाठी जे योगदान असेल ते देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

कोविड काळात आयआयटीचा उपयोग

कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे वाया गेली. कोविड महामारीचा उद्रेक असताना फर्मागुढी येथील आयआयटी इमारत कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून एकप्रकारे सामाजिक कार्यच आयआयटी गोवा केंद्राने केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद करून आयआयटी गोवाचे प्रमुख व इतरांचे अभिनंदन केले.

आयआयटी सांगेत, पण..!

वास्तविक आयआयटीसाठी सांगेत जागा निश्‍चिती झाली आहे, पण मुख्यमंत्र्यांनी सांगेचा उल्लेख करण्याचे टाळले. आयआयटीसाठी आतापर्यंत काणकोण व सत्तरीत विरोध झाला, पण सांगेत आता आयआयटी उभारण्यासाठी कार्यवाही सुरू असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आयआयटीसाठी लवकरच संकुल उपलब्ध करून दिले जाईल, पण ते कुठे हा उल्लेख टाळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com