जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; ३ डिसेंबरला नोवेना ऑनलाईन होणार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

जुन्या गोव्यातील जगप्रसिध्द असलेले सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त ३ डिसेंबरला असून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे यंदाची रोज होणारी (नोवेना) प्रर्थना सभा  ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

पणजीः जुन्या गोव्यातील जगप्रसिध्द असलेले सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त ३ डिसेंबरला असून कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे यंदाची रोज होणारी (नोवेना) प्रर्थना सभा  ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. भक्तांना रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चर्चमध्ये दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज चर्चमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.

जगात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुने गोवे चर्चला दरदिवशी सुमारे पाच हजारांहून अधिक पर्यटक भेट देतात. या चर्चच्या आवारात कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून भेट देणाऱ्या पर्यटकांची नोंद केली जात आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. फेस्तनिमित्त येत्या २४ नोव्हेंबरपासून नोव्हेना (प्रार्थना) सुरू होत असून पहिल्यांदाच ऑनलाईनद्वारे त्या होणार आहेत. 

येत्या ३ डिसेंबरला फेस्ताच्या दिवशी कोविड महामारीमुळे काही महनीय व्यक्तींच्या उपस्थितीसाठी २०० जणांनाच चर्चच्या आवारात होणाऱ्या ‘नोव्हेना’साठी अनुमती दिली णार आहे. दरवर्षीप्रमाणे या चर्चच्या आवारात दुकाने थाटण्यास परवानगीबाबत निर्णय झालेला नाही तरी काहींनी जागा अडवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी या जुने गोवे फेस्तासाठी देश - विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या चर्चच्या आवारात फेस्ताच्या दिवशी भाविक लाखोच्या संख्येने भेट देतात. राज्यातील कानकोपऱ्यातून ख्रिश्‍चन बांधव नोव्हेनासाठी दरवर्षी पस्थिती लावतात, मात्र कोविड महामारीच्या मार्गदर्शक सूचनांमुळे त्यांना यावर्षी उपस्थिती लावता येणार नाही. या फेस्तानिमित्त नोव्हेना सुरू होण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती गोमंतकियांपर्यंत आगाऊ कळविली जाणार आहे. 

या फेस्तानिमित्त वाहतूक पोलिसांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. फेस्ताला ख्रिश्‍चन बांधवांचा दरवर्षीप्रमाणे महापूर लोटला जाणार नसल्याने वाहतूक मार्गात बदल करण्याची तेवढी आवश्‍यकता नाही असा पोलिसानी मत व्यक्त केले. मात्र फेस्ताच्या दिवशी पर्यटक व स्थानिक लोकांची उपस्थिती वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिस तैनात करण्याचा निर्णय झाला आहे. 

जुने गोवे चर्चच्या परिसरात पर्यटकांना प्रवेश देताना कोविड मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्ती केली जात आहे. चर्चमधील वस्तूंना हात लावण्यास मनाई केली जात आहे. पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी फेस्तानिमित्त स्थानिक तसेच इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात फेरीवाले येतात मात्र यंदा त्यांना परवानगी दिली जाणार नाही. मात्र तेथे जे नेहमीची दुकाने व फिरते विक्रेते आहेत त्यांनाही तेथून हलवण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आरोग्य सेवा, पोलिस मदत तसेच प्रवासी वाहतूक सेवा तसेच पार्किंग व्यवस्थेसंदर्भातचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

अधिक वाचा :

गोव्यात सध्या कोरोना रुग्ण वाढल्याने पालकांत धाकधूक

गोव्यात कोळसा नको संघटना गुन्हा रद्द करण्याच्या मागणीवर चर्चा करून पुढील निर्णय घेणार

गोवा मुक्तिदिन सोहळ्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांना मुख्यमंत्र्यांनी दिले निमंत्रण

संबंधित बातम्या