अडीच महिन्‍यांपासून कचऱ्याच्या साम्राज्यात पेडणेकरांचे वास्तव्य..!

कचरावाहू ट्रकांशी असलेला करार संपल्याने जळीस्‍थळी कचऱ्याच्‍या राशी दृष्‍टीस पडत आहेत.
Pernem : अडीच महिन्‍यांपासून कचऱ्याच्या साम्राज्यात पेडणेकरांचे वास्तव्य..!
Pernem : अडीच महिन्‍यांपासून कचऱ्याच्या साम्राज्यात पेडणेकरांचे वास्तव्य..!Dainik Gomantak

पेडणे Pernem : तालुक्यातील कचऱ्याची उचल गेल्‍या अडीच महिन्‍यांपासून थांबल्‍याने मोठी समस्‍या निर्माण झाली आहे. साळगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा कचरावाहू ट्रकांशी असलेला करार संपल्याने जळीस्‍थळी कचऱ्याच्‍या राशी दृष्‍टीस पडत आहेत. काही ग्रामपंचायत कार्यालयांजवळच कचरा भरलेल्‍या पिशव्‍या पडून आहेत तर गावागावांमध्‍ये कचऱ्याची परस्पर विल्हेवाट लावण्याची वेळ लोकांवर आलेली आहे.

Pernem : अडीच महिन्‍यांपासून कचऱ्याच्या साम्राज्यात पेडणेकरांचे वास्तव्य..!
संरक्षण द्या, अन्‍यथा तीव्र आंदोलन छेडू..!

पेडणे तालुक्यात एकूण 20 ग्रामपंचायती आहेत. त्यातील हरमल, मांद्रे व मोरजी या किनारी भागात पर्यटन व्यवसायामुळे कचरा जास्त प्रमाणात निर्माण होतो. या तिन्ही पंचायतींनी आपापल्या पंचायत क्षेत्रातील कचरा नेण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. मात्र उर्वरित 17 ग्रामपंचायतींना अपयश आले आहे. या पंचायतींतर्फे नेमण्यात आलेले कर्मचारी ठरावीक दिवशी वाड्यावाड्यावर जाऊन लोकांनी घरात गोळा करून ठेवलेला कचरा पिशव्‍यांत भरतात व ग्रामपंचायत कार्यालयाजवळील जागेत किंवा जेथे सोय केलेली आहे तेथे आणून ठेवतात.

Pernem : अडीच महिन्‍यांपासून कचऱ्याच्या साम्राज्यात पेडणेकरांचे वास्तव्य..!
पणजी सुंदर नव्हे, तर खड्ड्यांचे शहर, नागरिकांचा संताप

ट्रकभर कचरा झाल्यावर ग्रामपंचायतीकडून साळगाव कचरा प्रकल्पाला कळविले जात व तेथून ट्रक येऊन हा कचरा नेत असत. पण गेल्‍या सप्टेंबर महिन्यापासून चतुर्थीनंतर साळगाव प्रकल्पाचा कचरावाहू ट्रकांबरोबर असलेला करार संपल्याचे व नवीन करार न झाल्याने पेडणे तालुक्यातील कचरा तसाच पडून आहे.

दरम्‍यान, गावातील काही लोक कचरा जाळून टाकतात किंवा उघड्यावर फेकून देतात. कचरा जाळल्याने प्रदूषणात भर पडत आहे तर उघड्यावर टाकल्याने रोगराई पसरण्याची भीती व्‍यक्त केली जात आहे. ही समस्‍या लवकर मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com