Pernem: न्हयबाग येथे तीस हजार रूपयांची दारू जप्त, सावंतवाडी येथील तरूण ताब्यात

Pernem Police seize liquor
Pernem Police seize liquorDainik Gomantak

न्हयबाग, पेडणे येथे कारमधून तीस हजार रूपयांची दारू (Seize Liquor) पेडणे पोलिसांनी जप्त केली आहे. महाराष्ट्र पासिंग असलेली या कारमध्ये व्हिस्की (Whisky), रम (Rum), ब्रान्डी (Brandy) या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. जप्त केलेली दारू अबकारी खात्याकडे (Excise Department) सोपविण्यात आल्या आहे. पोलिसांनी सावंतवाडी येथील तरूणाला ताब्यात घेतले आहे. (Pernem Police seize liquor, detained driver resident of sawantwadi)

Pernem Police seize liquor
Goa Zuari Car Accident : झुआरी पुलावरुन कोसळलेली कार 12 तासांनंतर बाहेर काढली

रोहित साळगावकर (रा. सावंतवाडी) असे ताब्यात घेतलेल्या कार चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पासिंग असलेल्या या कारमध्ये व्हिस्कीच्या १७ हजार ०११ रूपये किंमतीच्या ३८४ बाटल्या, १२ हजार ४८० रूपये किंमतीच्या ६२४ रमच्या बाटल्या आणि ब्रॅन्डीच्या १२४८ किंमतीच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अबकारी खात्याकडे जप्त मद्द सुपूर्त करण्यात आले आहे.

जप्त ३६.५४१ कि. ग्रॅम अंमली पदार्थाची एनसीबीकडून विल्हेवाट

वेगवेगळ्या पाच कारवाईत जप्त करण्यात आलेल्या ३६.५४१ किलो ग्रॅम अंमली पदार्थाची एनसीबीकडून (NCB) विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामध्ये गांजा २८.३९७ कि.ग्रॅम, चरस ७.६८२ कि.ग्रॅम, कोकेन ०.४५१ कि.ग्रॅम आणि ११.८२७ कि.ग्रॅम अंमली पदार्थांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com