पेडणे पोलिस ठाणे पोलिस निरीक्षकाविना

पेडणे पोलिस ठाणे मागच्या वीस दिवसांपासून पोलिस निरीक्षकाविना कार्यरत आहे.
Goa police
Goa policeDainik Gomantak 

मोरजी : पेडणे पोलिस ठाणे मागच्या वीस दिवसांपासून पोलिस निरीक्षकाविना कार्यरत आहे. त्यामुळे तक्रार घेऊन येणारे नागरिक आणि त्यांच्या समस्या दिवसेंदिवस जटील बनत आहेत. वादविवाद मिटले जात नाही किंवा त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, अशा लोकांच्या तक्रारी आहेत.

Goa police
वेळसाव येथे रेल्वेचे बॅरीकेटींग काम रोखले

पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असली तरी सध्या त्यांच्याकडे हणजूण पोलिस ठाण्याचा अतिरिक्त ताबा असल्याने पोलिस निरीक्षक नक्की कुठे भेटतील, असे तक्रारदार विचारत आहेत.

पेडण्यातील ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झालेले आहे. त्यात तक्रारींचा सोक्षमोक्ष अजून लागलेला नाही. त्यामुळे नागरिकही नाराजी व्यक्त करत आहेत. याकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पेडणे पोलिस ठाण्याचा कारभार सुधारावा, अशी मागणी लोकांतून केली जात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी हणखणे येथील एका नागरिकाने आपली पत्नी आणि छोटा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीचा तपासाबाबत आजपर्यंत काहीच कळाले नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com