काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांविरुद्धची याचिका फेब्रुवारीपर्यंत तहकूब

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 4 जानेवारी 2021

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यापर्यंत तहकूब केली.

पणजी :  काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यापर्यंत तहकूब केली. ही सुनावणी तहकूब करताना सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता याचिकेवर सभापतींना लवकर सुनावणी घेऊन निकालात काढाण्याचे निर्देश दिले.

संबंधित बातम्या