Jit Arolkar : गुन्हा रद्द करण्यासाठी मांद्रेचे आमदार आरोलकरांची याचिका

निवडणुकीपूर्वी हा गुन्‍हा आपल्याविरोधात राजकीय दबाव वापरून केल्याचा दावा आरोलकर यांनी करून तो रद्द करण्याची याचिकेद्वारे खंडपीठात मागणी केली आहे.
Jit Arolkar MGP
Jit Arolkar MGPDainik Gomantak

Jit Arolkar : धारगळ येथील कथित भू विक्री घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. ही याचिका गोवा खंडपीठासमोर आज सुनावणीस आली असता ती पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणात ते सध्या अटकपूर्व जामिनावर आहेत.

धारगळ येथील सर्वे क्रमांक 481 मधील जमिनीतील जागेचे दोन मालक आहेत. या जमिनीच्या एका मालकाची पावर ऑफ अटर्नी आमदार जीत आरोलकर यांच्याकडे आहे तर उर्वरित जमिनीची पावर ऑफ अटर्नी दुसऱ्या व्यक्तीकडे आहे. असे असताना आमदार आरोलकर यांनी संबंधित जमिनीचे विभाजन न करतात कथित बनावट दस्तावेज करून त्या जमिनीत भूखंड करून विक्री केली व सुरे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पेडणे पोलिस स्थानकात सध्या बांदेकर यांनी दोन वर्षापूर्वी तक्रार दाखल केली होती.

Jit Arolkar MGP
Konkan Railway : कोकण रेल्वेचे प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व

तक्रारीची दखल घेऊन पेडणे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आमदार आरोलकर यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. हे प्रकरण जमिनीच्या मालमत्तेचे असल्याने पेडणे पोलिसांनी ते आर्थिक गुन्हे कक्षाकडे वर्ग केले होते. निवडणुकीपूर्वी हा गुन्‍हा आपल्याविरोधात राजकीय दबाव वापरून केल्याचा दावा आरोलकर यांनी करून तो रद्द करण्याची याचिकेद्वारे खंडपीठात मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com