गोव्यातील सनातन संस्थेचं पेज ब्लॉक केल्याने फेसबुक विरोधात हायकोर्टात याचिका 

गोव्यातील सनातन संस्थेचं पेज ब्लॉक केल्याने फेसबुक विरोधात हायकोर्टात याचिका 
fecbook.jpg

मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Mumbai High Court) गोव्यातील सनातन संस्थेचं (Sanatan Sanstha Goa) फेसबुक पेज ब्लॉक केल्याने फेसबुक विरोधात आव्हान दिले आहे. 2011 मध्ये सनातन संस्थेच्या तीन फेसबुक पेजपैकी दोन आणि 2019 मध्ये एक तयार करण्यात आलं होतं. न्यायमूर्ती एम.एस. जावळकर (m s jawalkar) आणि न्यायमूर्ती एम.एस सोनक (M.S. Sonak) यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, फेसबुक इंडियातर्फे (Facebook India) वकिलांनी सनातन संस्थेद्वारे दाखल केलेल्या याचिकेसंबंधी युक्तीवाद करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. 8 जुलैपर्यंत खंडपीठाने हा खटला तहकूब केला आहे.

सनातन संस्थेने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, ''फेसबुक पेजवर लेख, हिंदू धर्माविषयी मार्गदर्शन आणि त्यावरील हल्ल्यांबद्दल माहिती आहे. तसेच याचा  कोणत्याही  व्यवसायिक कामांशी काहीही संबंध नाही हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे.'' सनातन संस्थेचे  सप्टेंबर 2020 मध्ये फेसबुक पेज ब्लॉक करण्यात आले होते. फेसबुकवरील पेज ब्लॉक करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. केंद्र सरकारच्या अधिकारांवर फेसबुक गदा आणत आहे. कायद्याच्या कोणत्याही प्रक्रियेचा अवलंब न करता भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.'' असे उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. (Petition in the High Court against Facebook for blocking the page of Sanatan Sanstha in Goa)

याचिकाकर्त्याला कोणत्याही प्रकारची संधी न देता त्याचे थेट फेसबुक पेज ब्लॉक करणे हे अन्यायकारक आहे आणि ते सुधारणे आवश्यक आहे. केवळ कोर्टाच्या किंवा केंद्र सरकारच्या निर्देशानुसारच फेसबुकला त्यांची पेज ब्लॉक करण्याचा अधिकार होता, असे सनातन संस्थेने म्हटले आहे. 

दरम्यान, सनातन संस्थेच्या मते केंद्रही आपल्या मूलभूत हक्काचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. याचिकाकर्त्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणे आणि देशातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे मात्र घटनात्मक हक्कांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.  वाढती सामाजिक , आध्यात्मिक, धार्मिक आणि देशभक्तीपर कामे पाहता फेसबुक पेज तयार केली जात आहेत. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com