गोव्यातही पेट्रोल-डिझेलचे दर वधारलेलेच; पणजीत पेट्रोल 87 रुपये प्रतिलीटर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

सर्वात जास्त दर हा दक्षिण गोव्यातील पोळे येथील पेट्रोल पंपावर असतो कारण वास्को  ते पोळे अंतर सर्वाधिक आहे. गोव्यात साडे पंधरा लाख लोकसंख्या असली तरी वाहनांची संख्या 17 लाखांवर केव्हाच गेली आहे.

पणजी : दिवसेंदिवस इंधनाचे म्हणजे पेट्रोल व डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. राजधानी पणजी शहरात आज पेट्रोलचा दर प्रतीलिटर 87 रुपये 01 पैसे होता. स्पीड पेट्रोल 90 रुपये 90 पैसे प्रती लीटर दराने विकले जात होते. डिझेलचा दर लिटरमागे 83 रुपये 74 पैसे होता. गोव्यात वास्को येथे इंधन साठवणुकीच्या टाक्या आहेत. त्यामुळे वास्कोतील दर हा प्रमाण दर मानला जातो. त्यानंतर वाहतुकीचा खर्च इंधनाच्या दरात जमा केला जातो. वास्को ते पणजी या अंतरासाठी लिटर मागे 30 पैसे दर आकारला जातो. म्हणजे पणजीच्या दरात लिटरमागे 30 पैसे हा वाहतूक खर्च असतो.

गोव्यातील हॉटेल व्यवसायाकडे भारतीय पर्यटकांची पाठ

सर्वात जास्त दर हा दक्षिण गोव्यातील पोळे येथील पेट्रोल पंपावर असतो कारण वास्को  ते पोळे अंतर सर्वाधिक आहे. गोव्यात साडे पंधरा लाख लोकसंख्या असली तरी वाहनांची संख्या 17 लाखांवर केव्हाच गेली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे सर्रासपणे दुचाकी व चारचाकी गाड्यांचा वापर हा चालतो. यामुळे इंधनाच्या बाबतीत दरडोई खप गोव्यात सर्वाधिक आहे.,असे मानले जाते.

गोव्यात 17 तारखेपासून जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

2012 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हा पेट्रोल वरील मूल्यवर्धित कर देशातील सर्वात कमी म्हणजेच 0.01 टक्के करण्यात आला होता. यामुळे पेट्रोलचा दर 60 रुपये प्रति लिटर झाला होता. त्यानंतर राज्य सरकारने 65 रुपये प्रति लिटर च्या वर पेट्रोलचा जर जाणार नाही असे आश्वासन दिले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल दराबाबत दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आणि पेट्रोलचे दर वाढतच गेले आहेत. आता पणजी मध्ये 87 रुपये 1 पैसे  दराने पेट्रोल विकले जात आहे.

अशा बघा आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्यतनित केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक आरएसपी 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक एचपीप्रिस यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

संबंधित बातम्या