
सपना सामंत
होंडा: सत्तरी या ठिकाणी रविवारी चार वाजताच्या सुमारास दारू पिऊन धिंगाणा घालीत काही तरुणांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावरील कर्मचारी व स्थानिक तरुणांनी होंडा पोलीस चौकीवर मोर्चा नेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत या संदर्भाची मागणी मोर्चेकरीनी लावून धरली होती. उपस्थित पोलिसांनी सदर मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते रात्री उशिरापर्यंत ते सापडू शकले नव्हते.
(petrol pump employee at Honda was beaten up in Goa)
याबाबतची माहिती अशी की रविवारी चार वाजण्याच्या सुमारास होंडा पेट्रोल पंपावरील एका कर्मचारी व सदर तरुणांमध्ये बाजाबाची झाली. गाडीच्या टायरमध्ये हवा भरण्याचे निमित्ताने हे बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर महाराणीत झाले.
सदर तरुणांनी पेट्रोल पंपवरील कर्मचारी महादेव गावकर यांना मारहाण केली. यामुळे स्थानिकांनी याला जोरदार विरोध केला व त्यांच्या विरोधात संघर्ष केला. यामुळे काही प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रसंगावधान राखून सदर तरुणांनी परिसरातून पलायन केले. यामुळे त्यांच्या अटकेसाठी व कारवाई करण्यासाठी पेट्रोल पंपारावरील कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी होंडा पोलीस चौकीवर मोर्चा नेऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली.
मात्र उशिरापर्यंत त्यांचा पत्ता लागला नव्हता. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे न सोडण्याचा इशारा यावेळी मोर्चेकर्यांनी दिला. यामुळे पोलिसांसमोर बऱ्याच प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
सदर संशयिताचा तपास लावून त्यांना अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जोपर्यंत त्यांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे न सोडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला होता .यामुळे रात्री उशिरापर्यंत या संदर्भाचा संघर्ष पोलीस ठाण्यावर सुरू होता अशी माहिती उपलब्ध झालेली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.