देशी पर्यटकांची सध्या गोव्याकडे धाव

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

राज्यात सध्या देशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांतील बंदीचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

पणजी: राज्यात सध्या देशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांतील बंदीचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

सप्टेंबरनंतर हळूहळू पूर्वपदावर येत असलेल्या या व्यवसायाला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. देशी पर्यटक सध्या गोव्याकडे धाव घेऊ लागला आहे. महाराष्ट्रात येण्या-जाण्याऱ्यांना कोरोनाविषयी थर्मल चाचणी सक्तीची केली असली तरी त्याचा फारसा परिणाम गुजरात, राजस्थानमधून वाहन घेऊन येणाऱ्या पर्यटकांवर झालेला नाही. अनेक कुटुंब सध्या गोव्यात साजरा होणारा नाताळाचा सण पाहण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता हॉटेलमध्ये थेट फोनद्वारे बुकिंग सुरू झाले आहे. त्यात किनारी भागात मोठ्या प्रमाणात हॉटेलच्या रुम कमी दरात उपलब्ध होत आहेत. चांगले पॅकेज मिळत असल्याने अनेक पर्यटकांची किनारी भागात राहण्यासाठी पहिली पसंती असल्याचे दिसत आहे. ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम ऑफ गोवा (टीटीएजी) शी संबंधित एका पदाधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. पणजी शहरातील निवासी हॉटेल खुली झाली असली तरी अनेकांनी २० ते ३० टक्के खोल्या सप्टेंबरपासून बंदच ठेवलेल्या 
आहेत. 

संबंधित बातम्या