...तरच मुख्यमंत्री देवदर्शन योजनेसाठी रेल्वे सोडणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दरम्यान या योजनेबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सविस्तर चर्चा केली.
...तरच मुख्यमंत्री देवदर्शन योजनेसाठी रेल्वे सोडणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत
CM pramod sawantDainik Gomantak

गोवा: फेब्रुवारी 2022 च्या निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने देव दर्शन यात्राही योजना जाहीर केली होती. दरम्यान या योजनेबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, एकदा 1,000 लोकांनी योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सरकार शिर्डी आणि वालंकिणी तीर्थक्षेत्री देव दर्शन यात्रा यात्रेसाठी नागरिकांना पाठवेल आणि त्यासाठी गाड्या बुक करता येतील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिली. सावंत पुढे म्हणाले, “मी जेव्हा तपासले तेव्हा केवळ 350 लोकांनी फॉर्म भरले होते.

(Pilgrimage tour scheme to be executed once 1000 people apply; CM pramod sawant)

CM pramod sawant
विश्वजीत आणि मायकल यांच्यात वादाची ठिणगी; कोण आहे मायकल? राणेंचा सवाल

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लोक उपजिल्हाधिकारी आणि समाज कल्याण विभागाकडे त्यांचे फॉर्म जमा करू शकतात, असेही ते म्हणाले.

सहा दिवसांचा असणार आहे देवदर्शन दौरा

दोन वेगवेगळ्या रेल्वे देवदर्शनासाठी मडगाव (Margao) येथील रेल्वे स्थानकावरून सोडल्या जाणार आहेत. एक रेल्वे मडगाव येथून 100 भाविकांना घेऊन तिरुपती - वालंकिणी, तर दुसरी रेल्वे 1000 भाविकांना घेऊन नाशिक (त्र्यंबकेश्‍वर) - औरंगाबाद - (ग्रिश्‍नेश्‍वर) - शिर्डी - शनी शिंग्नापूर येथे जाण्यास निघणार आहे. हा देवदर्शन दौरा सहा दिवसांचा असणार आहे. या योजनेनुसार अर्जदार स्वतःबरोबर मदतीसाठी 50 वर्षांवरील एका व्यक्तीला घेऊन जाऊ शकतो. हा देवदर्शन दौरा इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमार्फत (IRCTC) आयोजित करण्यात येणार आहे, असे नाईक म्हणाले.

50 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.

या योजनेखाली नाशिक व वालंकिणी येथे जाणाऱ्या भाविकांना अर्ज करण्यासाठी सरकारने पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर योजनेची सर्व माहिती देण्यात आली आहे. 50 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असतील. या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असलेल्या लोकांनी सरकारच्या पोर्टलवरून अर्ज डाऊनलोड करून घेऊन किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा समाजकल्याण खात्यातून तसेच मडगाव येथील समाजकल्याण खात्यातून जाऊन तो घ्यावा. या देवदर्शन दौऱ्यावेळच्या सर्व खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com