शांतादुर्गा विद्यालयातर्फे वैमानिक रिचा गोवेकर हिचा सन्मान

कु. रिचा गोवेकर ही शांतादुर्गा उच्च माध्यमिकची माजी विद्यार्थीनी असून शनिवारी (ता.9) डिचोलीत आयोजित कार्यक्रमात विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या हस्ते रिचा हिचा गौरव करण्यात आला.
शांतादुर्गा विद्यालयातर्फे वैमानिक रिचा गोवेकर हिचा सन्मान
Pilot Richa Govekar : प्राचार्य मिनेझिस यांनी स्वागत केले. प्रा. अनुष्का बालो हिने सूत्रसंचालन केले. तर उन्नती परब हिने आभार मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.Dainik Gomanatk

डिचोली: गोमंतकातील तरुण व्यावसायिक वैमानिक (पायलट) रिचा गोवेकर (Pilot Richa Govekar) हिचा विद्यावर्धक मंडळ संचलित डिचोलीतील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. कु. रिचा गोवेकर ही शांतादुर्गा उच्च माध्यमिकची माजी विद्यार्थीनी आहे. शनिवारी (ता.9) डिचोलीत आयोजित कार्यक्रमात विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या हस्ते रिचा हिचा गौरव करण्यात आला.

Pilot Richa Govekar  : प्राचार्य मिनेझिस यांनी स्वागत केले. प्रा. अनुष्का बालो हिने सूत्रसंचालन केले. तर उन्नती परब हिने आभार मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
सर्व प्रकल्प डिसेंबरपूर्वीच पूर्ण करणार: मुख्यमंत्री सावंत

यावेळी विद्यालयाचे व्यवस्थापक अरुण साळकर, खजिनदार राजेश धोंड, साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, प्राचार्य ओर्लांडो मिनेझिस, रिचा हिचे वडील लवू आणि आणि आई लीना गोवेकर उपस्थित होत्या. यावेळी विजय सरदेसाई यांनी रिचा हिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी रिचा हिने आपले मनोगत व्यक्त करताना, पालकांचे सहकार्य आणि कठीण मेहनत घेतल्यामुळेच आपण ध्येय प्राप्त करू शकले. असे सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com