वझरी येथे जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया

प्रतिनिधी
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

चांदेल पाणीपुरवठा प्रकल्पाच्या वझरी येथे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने आज लाखो लिटर पाणी वाया गेले.

पेडणे:  चांदेल पाणीपुरवठा प्रकल्पाच्या वझरी येथे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने आज लाखो लिटर पाणी वाया गेले. दुपार पर्यंत पाण्याचे उंच कारंजे उडत होते.यावर दुपार पर्यंत उपाय उपाय योजना न झाल्याने पाण्याचा दाब  कमी झाल्याने काही ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात तर काही नळाना अजिबात पाणी येत नव्हते.

पाण्याला मोठा दाब असल्याने  सुमारेपंध्रा  मीटर उंच पाण्याचे कारंजे उडत होते. यामुळे मुळे लाखो लिटर पाणी विना कारण वाया गेले. तर वझरी गावात नळाला कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. चतुर्थीचा सण दोन दिवसांवर आला असून पाणी पुरवठा खंडित झाल्यास लोकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे  लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत राहिल याकडे लक्ष द्यावे  अशी येथील लोकांची मागणी आहे.

 

संबंधित बातम्या