गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनच्या निवेदनाची पियुष गोयल यांनी घेतली दखल

हॉलमार्किंग बंधनकारकतेचा नियम चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी आहेत, त्यासाठी आवश्‍यक साधनसुविधांचा अभाव असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनच्या निवेदनाची पियुष गोयल यांनी घेतली दखल

Piyush Goyal 

Dainik Gomantak 

पणजी: गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनने (Goa Gold Dealers Association) नुकतेच आपल्या विविध मागण्यांबाबत केंद्र सरकारला निवेदन सादर केले. या निवेदनाची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी त्वरीत दखल घेतली, अशी माहिती या असोसिएशनने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

<div class="paragraphs"><p>Piyush Goyal&nbsp;</p></div>
अनुसूचित जमातींच्या आरक्षणासंबंधी सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू

असोसिएशनचे अध्यक्ष प्रमित रायकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री गोयल यांनी असोसिएशनच्या निवेदनाची दखल घेऊन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्‌ (बीआयएस) संघटनेला त्यांचे हॉलमार्किंग सेंटर स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

राज्यातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखांद्वारा शुद्ध सोन्याच्या (Gold) रूपात कच्चा माल पुरवठा केला जाईल. असोसिएशनने आपल्या या निवेदनात त्यांना त्यांचा व्यवसाय करताना अनेक अ़डचणींचा सामना करावा लागत असून, सरकारकडून (Government) त्यासंदर्भात विशेष पाठिंबा मिळत नाही याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. आपल्या व्यवसायासंदर्भात बाजारपेठेशी निगडीत एक समान कायदा असावा, असे असोसिएशनचे अध्यक्ष रायकर यांनी सांगितले. आयात शुल्क व जीएसटीत (GST) कपात करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. राज्यातील कारागिरांना चांगले संरक्षण देण्यात यावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

<div class="paragraphs"><p>Piyush Goyal&nbsp;</p></div>
डॉ. दिलीप वेर्णेकर यांचे निधन

व्यावसायिकांना चिंता

हॉलमार्किंग बंधनकारकतेचा नियम चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी आहेत, त्यासाठी आवश्‍यक साधनसुविधांचा अभाव असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्याच्या एक जिल्हा एक केंद्र या पध्दतीमुळे सुमारे 600 आस्थापने असलेल्या व्यावसायिकांना सुरक्षेबाबत चिंता असूनही लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो याकडेही लक्ष वेधण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com