Goa Plan: पर्यटकांसाठी गोव्याच्या वाटा खुल्या

या लोकांना गोव्यात मिळणार थेट एंट्री
Goa Plan: पर्यटकांसाठी गोव्याच्या वाटा खुल्या
Goa Dainik Gomantak

नुकत्याच जाहीर झालेल्या नविन नियमांनुसार गोव्यात (Goa) आता पर्यटकांना (Tourist) थेट एंट्री देण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने (Goa Court) नविन आदेश जारी केले आहे. ज्या नागरिकांचे पूर्ण लसीकरण (Vaccination) झाले त्या लोकांना गोव्यात नकारात्मक आरटी पीसीआर (RT-PCR) चाचणी अहवाल न देता प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. गोवा सरकारने (Goa Government) उच्च न्यायालयात एक अर्ज सादर केला होता ज्यामुळे पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना राज्यात प्रवेश दिला जाऊ शकतो असे सांगण्यात आले होते. परंतु आता गोवा खंडपिठाने हा आदेश डारी करून पर्यटकांना गोव्याच्या वाटा खुल्या करून दिल्या आहे.

जुलैच्या महिन्याच्या मध्यंतरी, उच्च न्यायालयाने पूर्णपणे लसीकरण केलेल्या लोकांना नकारात्मक प्रमाणपत्राशिवाय राज्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली होती, परंतु ही सूट पर्यटकांना नव्हती. गोव्यामध्ये पर्यटनाच्या उद्देशाने येणाऱ्यांना पूर्णपणे लसीकरण झाले असले तरी त्यांचे नकारात्मक पीसीआर प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य होते. HC च्या आदेशानुसार, एखाद्या व्यक्तीचा कोविड लसीचा दुसरा डोस घेवून दोन आठवडे झाले असेल तर त्याला पूर्ण लसीकरण झाले असे मानले जाते.

Goa
Goa: कळंगुट बीच पर्यटकांनी फुलला

पण सोमवारी, HC ने या आदेशात बदल केला आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना राज्यात प्रवेश दिला. दक्षिण गोवा अॅडव्होकेट्स असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारे वकील निखिल पै म्हणाले, “उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अर्जाला परवानगी दिली आहे जेथे पूर्ण लसीकरण झालेले लोक, त्यांच्या दुसऱ्या डोस घेतल्याच्या 14 दिवसानंतर आरटी-पीसीआर नकारात्मक चाचणीशिवाय गोव्यात प्रवेश करू शकतात. ”

मात्र दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचा नकारात्मक पीसीआर अहवाल द्यावा लागेल. दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना पीसीआर अहवाल द्यावा लागेल. तसेच गोवा सरकारने आंतराज्य कर्फ्यू 6 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे.

Goa
Goa Delta Plus: गोव्यात कोरोना रुग्णाच्या बाबतीत घडली अजब गोष्ट...

आतापर्यंत गोव्यात 1.74 लाख कोविड -19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर संक्रमणामुळे 3198 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या गोव्याची कोविड परिस्थिती सुधारत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.