सेवा सप्‍ताहानिमित्त नेरुलमध्‍ये वृक्षारोपण

वार्ताहर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

राष्ट्रीय सेवा सप्ताहानिमित्त साळगाव भाजपातर्फे नेरूल येथील काली माता मंदिराच्या परिसरात माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

पर्वरी:  राष्ट्रीय सेवा सप्ताहानिमित्त साळगाव भाजपातर्फे नेरूल येथील काली माता मंदिराच्या परिसरात माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

त्यावेळी साळगाव भाजपा मंडळाचे माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, जनरल सेक्रेटरी उमेश धारवाडकर, नेरूल भाजपा शक्ती प्रमुख राजेश कळंगुटकर, साळगाव भाजपाचे पदाधिकारी अॅड. दीलेश आसवेकर, नंदा मांद्रेकर, विनायक मयेकर, अजित रायकर, संदिप चोडणकर, प्रवीण शिरोडकर, अवधूत पेडणेकर, गौरेश दाभोळकर, लक्ष्मीकांत कळंगुटकर, शैलेश मोर, प्रदीप फडते व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आज भारत देशाची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आज जगभरात ते प्रसिद्ध आहे. देशात हरित क्रांती घडविण्यासाठी मोदी यांच्या प्रयत्नांची वाटचाल चालू आहे व आम्ही खारीचा वाटा समजून पर्यावरण अतिशय शुद्ध ठेवण्यासाठी अधिकाधिक झाडे लावावी, असे आवाहन माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यानी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी नेरूल केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बूथ प्रमुख विजय शिरोडकर यांनी केले, आभार प्रकटन राजेश कळंगुटकर यांनी केले.

संबंधित बातम्या