मांगोरहिलमधील नागरिकांचे ‘सेवा कार्य’, ‘कोरोना’वर मात करून केले प्लाझ्मा दान

बाबुराव रेवणकर
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

मांगोरहिल कंटेनमेंट झोनमधील जे रहिवासी कोरोना आजारांवर मात करून सुखरुप घरी परतले आहेत, त्या रहिवासीयांनी ‘सेवा कार्या’चे महत्त्व जाणत बुधवारी प्लाझ्मा दान केले. सुमारे २० जणांचे प्लाझ्मा आरोग्य खात्याने जमविले आहेत. 

मुरगाव
मांगोरहिल कंटेनमेंट झोनमधील जे रहिवासी कोरोना आजारांवर मात करून सुखरुप घरी परतले आहेत, त्या रहिवासीयांनी ‘सेवा कार्या’चे महत्त्व जाणत बुधवारी प्लाझ्मा दान केले. सुमारे २० जणांचे प्लाझ्मा आरोग्य खात्याने जमविले आहेत. 
मांगोरहिल झोपडपट्टीतील लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग राज्यभर पसरला आहे, असे गृहीत धरून मांगोरहिल आणि वास्को परीसरातील लोकांच्या बाबतीत गैरसमज करून घेऊन भेदभाव केला जायचा त्याला कुठे ना कुठे तरी आळा बसावा या हेतूने कंटेन्मेंट झोनमधील ज्यांना कोरोनाची बाधा होऊन ते आजारातून बरे झाले होते त्यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी विशेष शिबिर मांगोरहिलमध्ये आयोजित करून प्लाझ्मा दान कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. 

आमच्यासाठी इतरांचे जीवन महत्त्वाचे... 
मांगोरहिल झोपडपट्टीतील ज्या पोलिस शिपायाला कोरोनाची लागण झाली होती त्या शिपायाने सर्व प्रथम आपला प्लाझ्मा दान केला. आम्ही दान केलेल्या प्लाझ्मामुळे इतरांचा उपचार होऊन त्यांचे जीव वाचवावेत या शुध्द आणि माणूसकी च्या भावनेने आम्ही प्लाझ्मा दान केल्याचे रहिवाशांनी सांगितले. प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्यासाठी त्या परीसरातील नगरसेवक सैफुल्ला खान यांनी विशेष कष्ट घेतले होते. 

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या