''कामत यांच्यामुळे गोवा काॅंग्रेसची दुर्दशा ''

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

आगामी विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचे दोनसुद्धा आमदार निवडून येणार नाहीत, अशी टिका भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केली आहे.  

मडगाव : राखीवतेसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यामुळे भाजपच्या अस्ताचा प्रारंभ झाल्याचे वक्तव्य केलेले विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा आपल्याच काॅंग्रेस पक्षाला संपवण्याचा डाव आहे. कामत यांच्यामुळे काॅंग्रेसची दुर्दशा झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसचे दोनसुद्धा आमदार निवडून येणार नाहीत, अशी टिका भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केली आहे.  

पणजी महापालिका निवडणुकीत उभे करण्यासाठी आज काॅंग्रेसकडे उमेदवार नाहीत. काॅंग्रेसच्या या दुर्दशेस कामत हे जबाबदार आहेत.गोवा फाॅरवर्डसोबत कधीच युती करू नये असा ठराव काॅंग्रेसने घेतला होता. गोवा फाॅरवर्ड सोबत युती करण्यास काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन व फातोर्डा गट काॅंग्रेस समितीचा विरोध असतानाही कामत हे गोवा फाॅरवर्डशी युती करत आहेत.  पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची दिवास्वप्ने ते पाहात आहेत. मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी मोहीम सुरु केली असून या मोहिमेत काॅंग्रेस पक्षच संपवण्यचा घाट त्यांनी घातला आहे, असा आरोप मुुल्ला यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी पांडुरंग (भाई) नायक उपस्थित होते. 

गोव्यातील खाण कामगारांचा प्रश्न न सोडवता खनिज वाहतूक सुरु केल्याने कामगार आक्रमक

प्रभाग 22 मध्ये प्रभव पांडुरंग नायक निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने कामत यांचे धाबे दणाणले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कामत यांना मडगावचे मतदार झिडकारतील असे नायक यांनीसांगितले. 

संबंधित बातम्या