पत्रादेवी ते महाखाजन राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा

प्रकाश तळावणेकर
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

पत्रादेवी ते पोरस्कडेपर्यंत चारपदरी महामार्गाचे अपवादात्मक काम वगळता काम पूर्ण झालेले नाही. त्यासाठी एका बाजूने चारपदरी मार्गाचे काम गेली दोन वर्षे रडत रखडत सुरू असून, त्यासाठी बऱ्याच ठिकाणी एकाच मार्गाने वाहतूक सुरू आहे.

पेडणे
पत्रादेवी ते महाखाजनपर्यंत महामार्ग व काम सुरू असलेल्या चारपदरी महामार्गाला सर्वत्र खड्डे पडले असून, या खड्ड्यातून वाट काढीत वाहनांना प्रवास करावा लागत आहे. पत्रादेवी ते पोरस्कडेपर्यंत चारपदरी महामार्गाचे अपवादात्मक काम वगळता काम पूर्ण झालेले नाही. त्यासाठी एका बाजूने चारपदरी मार्गाचे काम गेली दोन वर्षे रडत रखडत सुरू असून, त्यासाठी बऱ्याच ठिकाणी एकाच मार्गाने वाहतूक सुरू आहे. वाहतूक सुरू असलेल्या अशा मार्गाचे डांबरीकरण करण्याची आवश्यकता होती. निदान दुरुस्ती तरी करण्याची आवश्यकता होती. पण, तसे न करता थेट या तशात स्थितीत या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने येणाऱ्या ताणामुळे रस्ता उखडला. त्यातच पावसाचे पाणी या अशा उखडलेल्या रस्त्यात साचून खड्ड्यांचा आकार वाढत गेला आहे. तर मालपे ते महाखाजनपर्यंत अनेक ठिकाणी महामार्गांची अशीच स्थिती झालेली आहे. अनेक ठिकाणी सर्व्हीस रोड उखडून गेलेले आहेत तसेच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनांनाची त्यामुळे नुकसानी होते.दुचाकी स्वरांचे तर बरेच हाल होत आहेत.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या