गोव्यात टॅक्सीचालक संपावर, तर पर्यटक वाऱ्यावर
taxi owner strick 1.jpg

गोव्यात टॅक्सीचालक संपावर, तर पर्यटक वाऱ्यावर

पणजी : गोवा माईल्स ही ॲपवर आधारीत टॅक्सी सेवा रद्द करावी आणि टॅक्सींना मिटर बसवावेत, या मागणीसाठी गोव्यातील पर्यटक टॅक्सीमालक गेल्या दोन दिवसांपासून पणजी येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू होते. टॅक्सीमालक संघटनेचे नेते बाप्पा कोरगावकर यांच्या नेतृत्त्‍वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील टॅक्सी असोसिएशनने संप पुकारला आहे. मात्र आता या संपाचा फटका गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना बसत आहे. टुरिस्ट टॅक्सीवाल्यांच्या बेमुदत संपामुळे कळंगुटमध्ये  येणाऱ्या पर्यटकांना बससाठी वाट पहावी लागत आहे. टॅक्सीअभावी त्यांना बससाठी वाट पहावी लागत असल्याने त्यांचे हाल होत आहेत.  (The plight of tourists due to the strike of taxi owners in Goa)

राज्यसरकारने  टॅक्सीचालकांना व मालकांना विश्‍वासात न घेता गोवा माईल्स ॲप टॅक्सीसेवा सुरू केल्याने टॅक्सीचालकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गोवा माईल्स सेवा बंद करण्यासाठी टॅक्सीचालकांनी आग्रह धरला आहे.  गोवा राज्य हे  जागतिक पर्यटनाचे केंद्र आहे. मात्र येथील पर्यटक उद्योग व हॉटेल्स परप्रांतीयांच्या ताब्यात आहेत. फक्त, टॅक्सी व्यवसायावरच  गोमंतकीयांचा ताबा राहीला आहे.  त्यामुळे सरकारने त्यांच्या हितासाठी तेंच्या मागण्या मान्य कराव्यात.  गोवा माईल्स ॲपवर आधारित टॅक्सी सेवेमुळे गोमंतकीय टॅक्सीचालकांना नुकसान होत आहे. त्यामुळे टी सेवा रद्द करून टॅक्सीना मिटर बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र आज गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी गोवा माईल्स रद्द करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे टॅक्सीचालक आणि टॅक्सीमालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पणजीतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.  

गोव्यातील टॅक्सी व्यवसाय गोमंतकियांनी सांभाळून ठेवला आहे. त्यामुळे गोवा सरकार त्यांचे हित नक्कीच जपते. मात्र सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि नव्या तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे आता टॅक्सीचालकांनीही बदलायला हवे. गोमंतकीय टॅक्सीचालकांचे हितासाठी ‘उबेर’ व ‘ओला’ या टॅक्सीसेवांना सरकारने गोव्यात परवानगी दिली नाही.  इतकेच नव्हे तर  टॅक्सीचालकांना  करमाफी व इतर माध्‍यमातून 34  कोटींचे सहाय्यही यासाठीच केले जाते. त्यामुळे येत्या काळात राज्यातील टॅक्सींचे दरही वाढवले जातील. मात्र, गोवा माईल्स रद्द केली जाणार नाही, असे माविन गुदिन्हो यांनी ठणकावून सांगितले आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com