Home Construction: पर्येतील ग्रामस्थांना गृह बांधणीसाठी भूखंड

आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते घर बांधण्यासाठी 20 कलमी कार्यक्रमांतर्गत 100 मीटर भूखंडाची सनद देण्यात आली.
Home Construction |
Home Construction |Dainik Gomantak

Construction Of Homes: गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा यादीत असलेल्या ‘भू’हीन नागरिकांना सरकारच्या महसूल खात्याच्या पुढाकाराने 30 रोजी आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते घर बांधण्यासाठी 20 कलमी कार्यक्रमांतर्गत 100 मीटर भूखंडाची सनद देण्यात आली. एकूण 18 जणांना प्रत्येकी 100 जागा देण्यात आली.

वाळपई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार डॉ. दिव्या राणे, मामलेदार दशरथ गावस, पर्ये सरपंच रती गावकर, होंडा सरपंच शिवदास माडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्ये मतदारसंघात येणाऱ्या विविध पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी भूखंडासाठी सत्तरी मामलेदार कार्यालयात अर्ज केले होते.

18 जणांना गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा यादीत राहावे लागले होते. सदर अर्जावर वरिष्ठ पातळीवरून मान्यता मिळत नसल्याने हे अर्ज प्रलंबित होती. परंतु या मतदारसंघाच्या आमदार दिव्या राणे यांनी प्रयत्न करून हा विषय मार्गी लावला.

Home Construction |
Cashew Feni: काणकोणात काजू फेणी गाळपाचे 89 विभाग

नियमानुसार घर बांधा!

आमदार डॉ. दिव्या म्हणाल्या, प्रत्येक नागरिकाला घराचा आसरा असणे गरजेचे आहे. मग ते छोटे असो किंवा मोठे याला महत्त्व नाही. आपल्या मालकीच्या जागेत स्वतःचे घर असणे, ही फार मोठी समाधानकारक बाब आहे.

त्यामुळे सनदी प्राप्त झालेल्या नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करून आपले घरकुल उभारावे, सत्तरी तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आरोग्य मंत्री विश्वजित राणे व सरकारांच्या सहकार्याने या पुढेही कार्यरत राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com