गोव्यासह 10 राज्यांच्या 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची बैठक 

गोव्यासह 10 राज्यांच्या 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची बैठक 
PM meeting with 54 district collectors of 10 states including Goa

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) 10 राज्यांच्या 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत 20 मे ला सकाळी 11 वाजता कोरोनाच्या सध्यस्थितीवर संवाद साधणार आहेत. या बैठकीत तमिळनाडू, कर्नाटक, आसाम, गोवा (Goa), हिमाचल प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि चंदीगड  या  राज्यांचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद (Video Conference) साधणार आहेत. जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. 

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पहावयास मिळत आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 63 हजार 533 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज देशात 2 कोटी 52 लाख 28 हजार 996 कोरोनारुग्ण आहेत. तर यातील 2 कोटी 15 लाख 96 हजार 512 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या 33 लाख 53 हजार 765 एकूण सक्रिय रुग्ण असून, 2 लाख 78 हजार 719 मृत्यु आतापर्यंत झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 18 कोटी 44 लाख 53 हजार 149 लसीकरण झाले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com