गोवातील 20 सहकारी पतसंस्थांना PMCच्या आर्थिक घोटाळ्याची झळ!

Agonda: पतसंस्थांचे एकूण 175 कोटी रुपये पीएमसीकडे अडकले आहेत.
PMC Bank
PMC BankDainik Gomantak

Agonda: गोवा राज्यातील 20 सहकारी पतसंस्थांना पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक पीएमसी (Punjab and Maharashtra Co-operative Bank) आर्थिक घोटाळ्याची झळ बसली आहे. पतसंस्थांचे एकूण 175 कोटी रुपये पीएमसीकडे अडकले आहेत. ही रक्कम नियोजित वेळेत या संस्थांना देण्यास पीएमसी बँकेला अपयश आल्याने आता या संस्थांनी संघटित होऊन उच्च न्यायालयाची दारे ठोठावण्याची तयारी केली आहे.

आर्ले - फातोर्डा येथील गोवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात काल माजी मंत्री प्रकाश वेळीप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला केपे अर्बन, व्हीपीके अर्बन, सत्तरी अर्बन, काणकोण अर्बन, श्री लक्ष्मी नृसिंह अर्बन, पंचशील अर्बन, गाडगेबाबा अर्बन, पर्रा वेर्ला काणका अर्बन, कालिका अर्बन, सहकार अर्बन, दीनदयाळ अर्बन, बार्देश अर्बन व अन्य अर्बन संस्थांचे अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक उपस्थित होते.

PMC Bank
Punjab-Haryana HC: सुसाईड नोटमधील नाव एखाद्याला दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही

अधिक व्याज मिळावे आणि सुरक्षित ठेव म्हणून राज्यातील सहकारी अर्बन संस्थांनी ही रक्कम पीएमसी बँकेत ठेव म्हणून ठेवली होती, ती रक्कम सध्या अडकली असल्याचे बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वेळीप यांनी सांगितले.

केपे अर्बन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप आणि अन्य चार संस्थांच्या प्रतिनिधींनी मुंबई येथे जाऊन नामांकित वकिलाची भेट घेऊन चर्चा केली. याबाबतचा सर्व अहवाल कालच्या बैठकीत सादर करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत अजित पैंगीणकर, ज्ञानेश्वर नार्वेकर, अशोक गावडे, परेश कुंकळ्येकर, प्रशांत कुडतरकर, हितेंद्र करमरकर, लक्ष्मण गावस, शरण मोरजकर, उल्हास मांद्रेकर, सुनील नाईक, श्याम हरमलकर, मधुकर पाटणेकर, बाबू कोनाडकर, वामन तारी यांनी चर्चेत भाग घेतला.

PMC Bank
Karnataka Hijab Ban: शीख धर्माच्या तुलनेवर SC ने केला 'फाइव्ह के'चा उल्लेख

न्यायालयाला लवकरच संयुक्त निवेदन : पीएमसी बँकेत जमा केलेली रक्कम ही ठेवीदारांची पुंजी आहे. सुरवातीची काही वर्षे संस्थांना त्यांच्या ठेवीवरील रकमेतून व्याज देण्यात आले. मात्र, त्यानंतर संपूर्ण बँकेचा व्यवहारच ठप्प झालेला आहे. त्यामुळे ही रक्कम लवकरात लवकर संस्थांना मिळवून देण्यासाठी न्यायालयाची दारे ठोठवावी लागली तरी त्याची तयारी या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनी ठेवली असून लवकरच संयुक्तपणे एक निवेदन उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे वेळीप यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com