मंगळूरस्थित कोकणी कवी मेल्विन रोड्रिग्स यांची साहित्य अकादमीच्या निमंत्रकपदी निवड

साहित्य अकादमीच्या इतिहासात प्रथमच गोव्या बाहेरच्या कोकणी साहित्यिकाची निवड
Writer Melvyn Rodrigues
Writer Melvyn RodriguesDainik Gomantak

मंगळूरस्थित कोकणी कवी आणि कविता ट्रस्टचे संस्थापक मेल्विन रोड्रिग्स यांची साहित्य अकादमीच्या कोकणी सल्लागार समितीचे निमंत्रक म्हणून आज निवड करण्यात आली.

साहित्य अकादमीच्या सर्वसाधारण मंडळाच्या 99 सदस्यांची आज नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत त्यांची या निमंत्रकपदी निवड करण्यात आली.

Writer Melvyn Rodrigues
Relationship Tips: नात्यात भावनिक बंध वाढवण्यासाठी 5 मार्ग; आयुष्यभरासाठी बॉंडिंग राहील घट्ट

साहित्य अकादमीच्या इतिहासात प्रथमच गोव्या बाहेरच्या कोकणी साहित्यिकाची निवड करण्यात आली असून या निवडीमुळे रॉड्रिग्ज हे पाच वर्षासाठी ते साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होणार आहेत.

जानेवारी महिन्यात साहित्य अकादमीच्या सर्वसाधारण मंडळाच्या सदस्यांची निवड करण्यात आली होती. कोकणीचे प्रतिनिधी म्हणुन रॉड्रिग्ज यांच्यासह कोकणी गीतकार पूर्णानंद च्यारी यांची निवड करण्यात आली होती.

Writer Melvyn Rodrigues
Fire in Goa : गोघळ हौसिंग बोर्डजवळ टेकडीला आग

रॉड्रिग्ज हे दायजीवर्ल्ड मिडिया या कंपनीचे संचालक असून त्यांची कवितेचे 34 संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आपल्या कविता ट्रस्ट या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात 220 पेक्षा जास्त कार्यक्रम केले आहेत.

या निमंत्रकपदी निवड झाल्या नंतर बोलताना रॉड्रिग्ज यांनी जो कोकणी समाज अजून साहित्या पासून दूर आहे त्याला सहित्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असेल असे त्यानी सांगीतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com