दोन दिवसांत 50 वाहनचालकांवर कारवाई

वेग मर्यादेचे उल्लंघन : ‘अटल सेतू’वर भरधाव जाणाऱ्या अनेक वाहनांची नोंद
Atal Setu
Atal Setu Dainik Gomantak

पणजी : ‘अटल सेतू’ या पुलावरून भरधाव वाहने चालविली जात असल्याच्या तक्रारी आल्याने वाहतूक पोलिस विभागाने या पुलावर विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत या पुलावरून वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे 50 वाहन चालकांची नोंद करण्यात आली आहे. सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वाहन चालविल्याचे नोंद केलेल्या प्रकरणांमध्ये आढळून आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील रस्ता अपघाताचे वाढणारे प्रमाण तसेच नियमांचे उल्लंघन या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. अटल सेतू पुलाच्या दोन्ही बाजूने स्पीड रडार उभे करण्यात आले असून सुमारे 100 मीटर अंतरावर असलेल्या वाहनाचा वेग या रडारमध्ये नोंद होत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. या पुलावर वेगमर्यादा 50 किलोमीटर असूनही त्याचे पालन न करताच वाहनचालक ओव्हरटेकिंग करत असल्याचे दिसून आले आहे.

भरधाव वाहने हाकल्याने वळणावर वाहने उलटी होण्याचे प्रकारही घडले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी तसेच वाहनचालकांवर वेगमर्यादेचे नियंत्रण येण्यासाठी पुढील काही दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक ब्रँडन डिसोझा यांनी दिली.

Atal Setu
फोंड्यात शाळांमधील सुविधांचे वाजले तीन तेरा

नव्या मांडवी पुलावर यापूर्वी स्पीड रडार उभे करून वाहतूक पोलिस कारवाई करत होते. या कारवाईला पर्यटन दुचाकीस्वार अधिक तर बळी पडत होते. या पुलावरून जाणाऱ्या - येणाऱ्या बसेस तसेच ट्रकांच्या वेगावर पोलिसांच्या या दक्षतेमुळे नियंत्रण आले होते. अनेक वाहनचालक वेगाने जाण्यासाठी अटल सेतूचा वापर करत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली.

सध्या खात्याकडे असलेल्या स्पीड रडारची कमतरता असल्याने राज्यातील सर्व पुलांच्या ठिकाणी या यंत्रणाचा वापर करण्यास अडचणी येत आहेत, अशी माहिती पोलिसाने दिली.

Atal Setu
गोव्यातील पंचायत निवडणुकीच्या फाईल्स आयोगाकडे

वाहनचालकांना कारवाईची नोटीस घरपोच

ही मोहीम पुढील काही दिवसांत अधिक तीव्र करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्पीड रडार पुलाच्या दोन्ही बाजूने लावले गेले आहेत याची कल्पना नेहमी या पुलावरून जाणाऱ्या चालकांना आल्याने त्यांची गती कमी झाली आहे. मात्र, पर्यटकांना त्याचा अंदाज नसल्याने ते या कारवाईला बळी पडत आहेत. काही दुचाकीस्वारही या पुलावर वाहने घेऊन येताना नोंद झाली असून त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पुलावर वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्यांची नोंद करून त्यांना घरपोच कारवाईची नोटीस पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती एका वाहतूक पोलिसाने दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com