एनएसयुआयचे सदस्य पोलिसांच्या ताब्यात

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुणांची टक्केवारी २० टक्क्यावरून ५० टक्क्यांवर नेण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ठरवून नापास केले असल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी केला. 

पणजी : काँग्रेस पक्षाच्या नॅशनल स्टुडंट युनियनच्या (एनएसयुआय) सदस्यांना आज गोवा विद्यापीठात पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुणांची टक्केवारी २० टक्क्यावरून ५० टक्क्यांवर नेण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ठरवून नापास केले असल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष अहराज मुल्ला यांनी केला. 

युनियनचे हे सदस्य विद्यापीठात गेले. यावेळी तेथे पोलिसांनी त्यांना अडविले आणि येथे येण्याचे कारण विचारले. कुलगुरूंना भेटायचे असल्याचे सांगताच कुलगुरू नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. कार्यालयात उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देतो, अशी मागणी आंदोलकांनी केली. मात्र तरीही पोलिसांच्यात आणि आंदोलकांच्या वादावादी झाल्याने आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले  विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुण हे अतिशय महत्वाचे असतात आणि या गुणांच्या बाबतीत इतका मोठा बदल करण्यात आला आहे, अशा पद्धतीने भेटू न देता पोलिसांनी ताब्यात घेणे म्हणजे आमचा आवाज दाबण्यासारखे असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.

संबंधित बातम्या