अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी इस्रायली नागरिकाला अटक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

 हणजूण व शापोरा येथे दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ३१ लाखांचा अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांमध्ये इस्रायली नागरिक बेन आबू इल्हान (४९) व हिमाचल प्रदेशच्या एका तरुणाला अटक करण्यात आली. या दोन्ही कारवाईत एमडीएमए, चरस, गांजा व एलएसडी प्रकारचा ड्रग्ज सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पणजी :  हणजूण व शापोरा येथे दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ३१ लाखांचा अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांमध्ये इस्रायली नागरिक बेन आबू इल्हान (४९) व हिमाचल प्रदेशच्या एका तरुणाला अटक करण्यात आली. या दोन्ही कारवाईत एमडीएमए, चरस, गांजा व एलएसडी प्रकारचा ड्रग्ज सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने दाबोळवाडा - शापोरा येथील एका फ्लॅटमध्ये छापा टाकला. या फ्लॅटमध्ये इस्रायली भाडेपट्टीवर
राहत होता. तो ड्रग्ज विक्रीमध्ये गुंतला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. त्याच्या फ्लॅटची झडती घेतली असता त्याच्याजवळ १७८ ग्रॅम एमडीएम, ३० ग्रॅम चरस मिळून सुमारे २६ लाख ६० हजारांचा ड्रग्ज सापडला होता. यावेळी त्याच्याकडून त्याचा पासपोर्ट, दोन मोबाईल्स तसेच ३० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे. अंमलीपदार्थविषयक कायद्याखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मायकल वाडा - हणजूण येथे भाडेपट्टीवर राहत असलेल्या हिमाचल प्रदेशच्या एका तरुणाच्या खोलीवर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला.

संबंधित बातम्या